फक्त तुझ्याचसाठी …
- Amit Parthe
- Mumbai, Maharashtra, India
- वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?
शुक्रवार, २४ जून, २०११
आज मला ती अचानक दिसली..
आज मला ती अचानक दिसली..
कधीकाळी आपलीशी असणारी..
आज किती परकी वाटली।
ढगाळ आकाश अन् सुसाट वारा..
ओढणी सांभाळत ती फार सुंदर वाटली।
डोळे भरुन तिला पाहण्याऐवजी..
माझ्याच डोळ्यात आसवं दाटली।
क्षणभर वाटलं थांबवावं तिला..
पण पुन्हा मनाला भिती वाटली।
तिच्या अनेक आठवणीँ मध्ये..
आज अजून एक आठवण साठली।
मनापासून सांगतो मित्रांनो,
आज पूर्ण दिवसाची वाट लागली।।
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)