आज मला ती अचानक दिसली..
कधीकाळी आपलीशी असणारी..
आज किती परकी वाटली।
ढगाळ आकाश अन् सुसाट वारा..
ओढणी सांभाळत ती फार सुंदर वाटली।
डोळे भरुन तिला पाहण्याऐवजी..
माझ्याच डोळ्यात आसवं दाटली।
क्षणभर वाटलं थांबवावं तिला..
पण पुन्हा मनाला भिती वाटली।
तिच्या अनेक आठवणीँ मध्ये..
आज अजून एक आठवण साठली।
मनापासून सांगतो मित्रांनो,
आज पूर्ण दिवसाची वाट लागली।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा