डोळ्यात पाणी असून ही
त्यांना ही कसं पारतंत्र आलय
आपला गुन्हा नसताना ही
नावाला बट्टा लागल्यागत झालय
आज सगळच कसं आभाळ फाटल्यागत झालय
आपलं माणूस आपलं माणूस
म्हणून ज्यांना जीव लावला
त्यना आपली साथ सोडताना
काहीच कसं वाटना झालय
आज सगळच कसं आभाळ फाटल्यागत झालय
काय येवडं चुकलं होतं
म्हणून आज भोगायला आलय
वाटत भांड भांड भांडावं
पण कुणाशी हेच समजणा झालय
आज सगळच कसं आभाळ फाटल्यागत झालय
वाटतं आपण ही जगावं
दुसर्यान्ग्त हे माझं ते माझं करत
तसं वागायला गेला की
ते ही जमना झालय
आज सगळच कसं आभाळ फाटल्यागत झालय
आभाळ फाटल्यागत झालय ......................