फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शनिवार, १७ जुलै, २०१०

आज तुझी आठवण येत आहे..


आहे मी जिथे उभा
हाथात होता हात तुझा..
आज त्या रस्त्यावर एकटा उभा आहे
आज तुझी आठवण येत आहे..

दाटून आलेले ढग तो रिमझिम पाउस
एका छत्रीत ते जवळीक साधण..
आज एका आडोश्याला मी उभा आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

मधुर चांदण्याची ती रात्र
ऑफिस मधून घरी यायची घाई..
आज दाराचे कुलूप उघडायला घाबरत आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

तुझ्या प्रेमाने सजलेले ते घर
प्रत्येक कोपर्यात तुझाच भास..
आज तुझ्या एका हाकेस आतुर झालो आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

असह्य यातनाच ओझ दिलस
डोळ्यातील अश्रू हृदयातूनी वाहतात..
अखेरचा श्वास तुझ्या कुशीत सोडायचा आहे
आज तुझी आठवण येत आहे..आयुष्य हे जगताना...
एकटे मला वाटत आहे..
साथ देणारी तू आज मैलो अंतरावर आहे..
आज तुझी आठवण येत आहे.....

जीवन मुक्तीच साकड देवाकडे घालतोय
हसत हसत मरण याव याची वाट बघतोय
जवळ तुझ्या आज मी येत आहे..
आज तुझी आठवण येत आहे..आठवण येत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा