आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखी हसत नाही
उगाच हुंदक्यांच्या आवाजाने जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही
आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखी बोलत नाही
उगाच ओळखीच्या हाकेने जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही
आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखी चिडवत नाही
उगाच कसल्यातरी भासाने जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही
आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू नेहमीसारखी जवळ येत नाही
उगाच मी दचकल्याने मला जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही
आजकाल मला स्वप्नच पडत नाही
स्वप्नात तू वळून पाहत नाही
उगाच तुला थांबवताना मला जाग येते
मग पुन्हा मला झोपच लागत नाही
आजकाल मला स्वप्नच पडत नाही .........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा