नसता जवळी मी
ती वाट बघत रुसावी
क्षणात बघता मज
प्रेमरूपी फूगावी
बघता पुष्प मज जवळ
चेहऱ्यावर चमक दिसावी
लट थोडी बाजूला सारून
माफी तिला मागावी ..
तिचे लाड पुरवत
जवळ तिला करावी
कवेत माझ्या शिरून
ती गालातल्या गालात हसावी
स्तब्द श्वासांपरी
शब्दांना मोकळी करावी
आत खोल डोळ्यांमधून
हृदया पर्यंत पोहोचावी
हातात माझा हात घेवून
ती मनसोक्त फिरावी
धुक्यांमधील रम्य सृष्टी
तिच्या गालांवर दवरूपी दिसावी
दोघांमधील प्रेमगीत
चांदण्यांनी ऐकावी
चंद्राने झाडांमागून बघितले
कि ती पापण्या मिचकावून लाजावी
न्याहाळीत तिला असेच
प्रभात होवून जावी ..
तिच्या सोनेरी रूपाने
दुनिया उजळून निघावी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा