आता मलाच भीती वाटू लागली माझी
सरू लागली दूर सावली तुझ्या आठवणीची
सरू लागली दूर सावली तुझ्या आठवणीची
मन खंतावते, कोसते का झुरावे तुझ्यासाठी
ना आहे मनात आठवण... ना तुला गरज माझी
ना आहे मनात आठवण... ना तुला गरज माझी
रमलीस तू वेगळ्या विश्वात विसरुनी पाऊलखुणा
मीच रेंगाळत राहिलो इथेच सोशीत विरह यातना
मीच रेंगाळत राहिलो इथेच सोशीत विरह यातना
आज पहिले तुला... होती नजर अनोळखी अशी
भेटलेच नव्हतो कधी जन्मात होते कुणी परकी
भेटलेच नव्हतो कधी जन्मात होते कुणी परकी
नाहीस आता माझी तू कळतच नाही कळूनही
डोळ्यात पाणी उभे.. वेदना मनीची सरत नाही
डोळ्यात पाणी उभे.. वेदना मनीची सरत नाही
आता या वळणावर मजला दूर व्हायला हवे
विसरुनी दुख सारे पुन्हा मना फुलवायला हवे...
विसरुनी दुख सारे पुन्हा मना फुलवायला हवे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा