फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, १ ऑगस्ट, २०११

आज खुप रडाव वाटतय


 
माहिती नाही का ??
पण आज खुप रडाव वाटतय...


आईच्या कुशीत जावून झोपाव वाटतय
धावपळीच्या जीवनात , सुटली अनामोल नाती मागे
माहिती नाही का??
आज ती सगळी नाती पुन्हा एकदा जोडावी वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय...


केंव्हातरी ह्या गर्दी मध्ये गवसल होत कोणी माझ
माहिती नाही का??
आज त्याला परत शोधून आणाव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय....


रोज स्वप्नातच जगते मी
माहिती नाही का??
आज त्या स्वप्नाना दूर सारून वास्तवात याव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय...


रोज स्वता:शी खोट बोलते मी
माहिती नाही का??
आज स्वत:ला सगळ खर सांगव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय....


माहिती नाही का??
तुटलेल सार पुन्हा परत जोडाव वाटतय
आणि खुप खुप रडाव वाटतय.......
माहिती नाही का??
पण खुप खुप रडाव वाटतय !!!!!!!

1 टिप्पणी: