तू दूर दूर जाता मी एकटाच राहीलो,
क्षण अपुल्या सहवासाचे आठवात राहीलो...
तू अशी निघून जाता मी मलाच हरवून बसलो,
ओंजळ माझी रिकामी,सारे निसटून गेले,
आता दाहीदिशांतून आभास तुझेच उरती,
वाट तुझी बघताना अविरत डोळे झरती...
आठवते का ग तुलाही ते पावसातले भिजणे,
रोजच्या त्या भेटी, अन भेटींचे सारे बहाणे...
अजुनही पाऊस येतो, परी माझ्यासाठी नवखा,
तुझ्यावाचूनी मजला तोही वाटे परका...
मन माझे भरुन येते मेघ काळे बघूनी,
श्रावणातली रिमझिम होते नकळत माझ्या नयनी...
हातातून सुटला हात, परी जीव तसाच गुंतून होता,
कधीतरी येशील तू, ही एकच आस आता माझ्या मनी...
माझी अधीर अवस्था तुज कळतच नाही का ग?
एकच सांग मला की तू परत येशील का ग?
एकच सांग मला की तू परत येशील का ग?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा