मनाला असे दुःख होते तुझ्या जायचे
किती काय राहून गेले .. सांगायचे
जुन्या वेदना श्रांत होणार नाही अता
जखमेवरी फुंकरी कोण घालायचे ?
मौनात कैशी जपावीत अश्रुफूले
कसे चार चौघात ओठांत हासायचे ?
रात्रीतही चंद्र ताऱ्यात दिसतेस तू
पुन्हा वाटते, हे असे काय वाटायचे ?
स्मरणातुनी शक्य नाही भुलविणे तुला
तुझी आठवे घेउनी येथुनी जायचे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा