माझ्या ह्रदयाची होती ती राणी,
जिला वाहिली मी प्रीत दिवाणी...
परिसापरी मज स्पर्शुनी गेली,
जीवनी मोगरा फ़ुलवूनी गेली...
ह्रदयाच्या तारा छेडूनी ती गेली,
प्रीतीचे गान गाऊनी ती गेली...
श्रावणसरी बरसूनी ती गेली,
चांदणराती उजळूनी ती गेली...
रंगात तिच्या रंगवूनी ती गेली,
आयुष्य माझे बदलूनी ती गेली...
मला एकट्याला सोडूनी ती गेली,
कळेना का माझी न होता ती गेली...
जिला वाहिली मी प्रीत दिवाणी...
परिसापरी मज स्पर्शुनी गेली,
जीवनी मोगरा फ़ुलवूनी गेली...
ह्रदयाच्या तारा छेडूनी ती गेली,
प्रीतीचे गान गाऊनी ती गेली...
श्रावणसरी बरसूनी ती गेली,
चांदणराती उजळूनी ती गेली...
रंगात तिच्या रंगवूनी ती गेली,
आयुष्य माझे बदलूनी ती गेली...
मला एकट्याला सोडूनी ती गेली,
कळेना का माझी न होता ती गेली...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा