तुझ्या आठवणीत मनपाखरू,
जेव्हा फिरते भिरभिर
ओल साचते डोळ्यात,
नी काळजात दुखते खोलवर
विव्हळणा-या वेदना,
सुखावून जातात आठवणीने,
आणि विसावल्या जखमाही,
जाग्या होतात क्षणभर
येणा-या आठवणींसाठी मी,
जागा करतो घरात माझ्या
जगून घेतो संगे,
जसा कधी जगलोच नव्हतो आजवर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा