तू नुसती दिसलीस तरी मला खूप बर वाटत,
तुझा हात हातात घेतल्यावर मनात एक वादळ उठत...
असं वाटत की सतत तुझ्यासोबतच राहावं,
तुझ्याच मांडीवर डोक ठेवून तासंतास झोपावं...
तुझ्या आठवणीत वेळ कसा निघून जातो काही कळतंच नाही,
तू दूर असलीस की मनाची तळमळ काही थांबतच नाही...
असं वाटत की, आहे तिथून उठून तुझ्या जवळ यावं,
तुला माझ्या मिठीत घेऊन, घट्ट पकडून ठेवावं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा