फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

तु म्हणजे एक स्वप्न...,
भल्या पहाटे पडणारे,
तरीही खोटे ठरणारे........ ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
मनात दडुन ठेवलेले,
कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन ओघळारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
श्वासाश्वासात भिनलेले,
तरिही दुर दुर असणारे... ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
तुझ्या आठवणीत जगणारे,
मित्र जवळ असुनही, तुलाच शोधत फ़िरणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
दिवसा सुद्धा छळणारे,
ती सोबत नसतानाही, असल्याचे भासविणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
आठवणींचा कोंदवाडा करणारे,
अनेकदा सावरले तरीही, पुन्हा सर्व पसरणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
माझे कधिही न झालेले,
तु दुर असलीस तरीही, तुझ्या सुखासाठी तळमळणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
तुझ्या विरहात एकटेच जगणारे,
तु जिंकावीस म्हणुन, कितेकदा स्वत:लाच हरविणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
येण्याची तुझ्या, त्याच वळणावर वाट पाहणारे,
प्रत्येक वसंतात झडुनही, पालवीची आस धरणारे ।

तु म्हणजे एक स्वप्न...,
शब्दा शब्दात विणलेले,
मला मात्र नव्या कवितेला वाव देणारे ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा