पाहुनी मज अशी
ती का हसते...?
मज ओळख नसली
तरी आपलीशी भासते...
नयनी मज तिच्या
माझे प्रतिबिंब दिसते...
ओठांवरी तियेच्या
माझेच गीत सजते...
चोरुनी मज अशी
ती सांज वेळी पाहते...
नजरानजर होताना
हलकेच गाली हसते...
आज तिच्या हाती मज
ते गुलाब का दिसते...?
उदास मन माझे
डोळे मिटुनी का बसते...?
स्पर्श हा असा कोणता...?
जो मज आपलासा वाटे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा