फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, २० जुलै, २०१०

खरंच असं.. असतं का प्रेम????




एका डॉक्टरांकडे एक८०-८५ वर्षांचे म्हातारेगृहस्थ आपल्या जखमेचेटाके काढून घ्यायला गेले.सकाळी .३० चा सुमार.ते डॉक्टरांना म्हणाले,थोडं लवकर होईल काकाममला ९ वाजताएकीकडे जायचंय. 
डॉक्
टरांसमोर त्या क्षणीकाहीच काम नव्हतंत्यांनीजखम तपासली,सामानाची जमवाजमव केली आणि टाके काढायचीतयारी केलीदरम्यानतेत्या गृहस्थाशी गप्पा मारतहोते. 
""आजोबा
 वाजतादुसऱ्या डॉक्टरांचीअपॉइंटमेंट आहे का?'' 
""नाही
मला  वाजतामाझ्या बायकोबरोबरनाश्ता करायला दुसऱ्याहॉस्पिटलमध्ये जायचंय.'' 
""हॉस्पिटलमध्ये
आजारीआहेत का त्या?'' 
""हो
गेली पाच वर्षेहॉस्पिटलमध्येच आहे ती.'' 
""अच्छा
आणि तुम्हीवेळेवर गेला नाहीततरवाट पाहतील ना त्या?काळजीही करतील...?'' 
""नाही
 डॉक्टरतिला "अल्झायमर्सझालायतीगेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही.'' आजोबाशांतपणे म्हणाले. 
डॉक्
टर चकित होऊनम्हणाले, ""आणि तरीहीतुम्ही रोज त्यांच्याबरोबरनाश्ता करायला इतक्यावेळेवर आणि धडपडूनजातात्या तुम्हालाओळखतही नसताना?'' 
त्यावर
 पुनः तितक्याचशांतपणे म्हातारे गृहस्थम्हणाले, ""डॉक्टर ती मलाओळखत नसलीतरी मीतिला गेली कित्येक वर्षेओळखतोमाझी बायकोआहे तीआणि माझं जिवापाड प्रेम आहेतिच्यावर.'' 
ऐकता
 ऐकता डॉक्टरांच्याअंगावर रोमांच उभेराहिलेगळा दाटून आला.त्यांच्या मनात आलं, ""हेखरं प्रेमप्रमे म्हणजे काहीनुसतं घेणं नव्हेतरत्याबरोबर कितीतरी देणं,निरपेक्षपणे स्वतःकडचाआनंद लुटवणंउधळणं -त्या गृहस्थांसारखं.'' 
अचानक
 इंटरनेटवरूनआलेल्या अनेकसंदेशांमधला एक संदेशडॉक्टरांना आठवला- 
""चांगल्या
 लोकांच्यावाट्याला नेहेमीच सगळंसर्वोत्तम येतं असं नाही - पण जे वाट्याला येतंत्यातलं सर्वोत्तम शोधून तेआयुष्य साजरं करतात.'' 
यालाच
 आयुष्य म्हणायचं.आपल्या माणसाला आहेतसं स्वीकारणं आणिआपल्या दोन्ही हातांनी,आपल्या सर्वस्वानेत्याच्यावर प्रेमाचा वर्षावकरणं... 
खरंच
 मिळेल असं प्रेमआपल्याला अन्‌ जमेल काअसं प्रेम करणंआपल्याला?...

--- आभाळमायाअसं असतं काप्रेम?

सोमवार, १९ जुलै, २०१०

माझी न होता ती गेली...


माझ्या ह्रदयाची होती ती राणी,
जिला वाहिली मी प्रीत दिवाणी...

परिसापरी मज स्पर्शुनी गेली,
जीवनी मोगरा फ़ुलवूनी गेली...

ह्रदयाच्या तारा छेडूनी ती गेली,
प्रीतीचे गान गाऊनी ती गेली...

श्रावणसरी बरसूनी ती गेली,
चांदणराती उजळूनी ती गेली...

रंगात तिच्या रंगवूनी ती गेली,
आयुष्य माझे बदलूनी ती गेली...

मला एकट्याला सोडूनी ती गेली,
कळेना का माझी न होता ती गेली...

मनाला असे

मनाला असे दुःख होते तुझ्या जायचे
किती काय राहून गेले .. सांगायचे

जुन्या वेदना श्रांत होणार नाही अता
जखमेवरी फुंकरी कोण घालायचे ?

मौनात कैशी जपावीत अश्रुफूले
कसे चार चौघात ओठांत हासायचे ?

रात्रीतही चंद्र ताऱ्यात दिसतेस तू
पुन्हा वाटते, हे असे काय वाटायचे ?

स्मरणातुनी शक्य नाही भुलविणे तुला
तुझी आठवे घेउनी येथुनी जायचे
तुझी आठवण होताच मन माझे चिंब भिजते, 
तुझ्या प्रत्येक भेटीचे खरे कारण विचारते 

नेहमी बहाणे बनव्याचे मन माझे, तुला भेटायला 
पण आज तेच माझ्याकडे वैऱ्यासारखे पाहते 

आत्ता विचार करून काय फायदा 
तरी ते तुझ्या सालामातीची दुवा देवाकडे मागते 

जेथे असशील तेथे सुखात राहा कारण, 
तुझ्या मागे माझे वेडे मन पळते ...

शनिवार, १७ जुलै, २०१०

तू आणि तुझी आठवण,

तू आणि तुझी आठवण ,
दोन्ही पण खुप वेगळे आहेत.

तू नाही पण तुझी आठवण ,
माझ्यासोबत प्रत्येक क्षणी असते.

माझ्या एकटेपणाला तू हवी असतेस,
पण तुझी आठवणच माझ्या सोबत असते.

काही वेळा तर तुझ्या सोबत खुप बोलावेसे वाटते,
पण माझ्या मनात दडलेला तुझा आवाज ऐकून मन हलके होते,

पुन्हा एकदा तुझ्यापेक्षा, तुझी आठवण माझी साथ देते.
आणि माझ्या एकटेपणाचा श्वास होते.

पण तुझ्या आठ्वानिसोबत नाही ग, 

तुझ्यासोबत मला जगायचं....
तू आणि तुझी आठवण खुप वेगले आहेत.
कुठला ही ऋतू
बदलून आला तरी.....

आकाश पाताळ
एक झाला तरी.....

स्वतः मरायचा
मोह झाला तरी .....

सारे विसरायचा ही
रोग झाला तरी .....

आणि.....
उभ्या आयुष्याचा
गजनी झाला तरी

मी विसरणार नाही
ती एक गोष्ट म्हणजे
.
.
तुझी आठवण.....!

आज तुझी आठवण येत आहे..


आहे मी जिथे उभा
हाथात होता हात तुझा..
आज त्या रस्त्यावर एकटा उभा आहे
आज तुझी आठवण येत आहे..

दाटून आलेले ढग तो रिमझिम पाउस
एका छत्रीत ते जवळीक साधण..
आज एका आडोश्याला मी उभा आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

मधुर चांदण्याची ती रात्र
ऑफिस मधून घरी यायची घाई..
आज दाराचे कुलूप उघडायला घाबरत आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

तुझ्या प्रेमाने सजलेले ते घर
प्रत्येक कोपर्यात तुझाच भास..
आज तुझ्या एका हाकेस आतुर झालो आहे..
आज तुझी आठवण येत आहे..

असह्य यातनाच ओझ दिलस
डोळ्यातील अश्रू हृदयातूनी वाहतात..
अखेरचा श्वास तुझ्या कुशीत सोडायचा आहे
आज तुझी आठवण येत आहे..



आयुष्य हे जगताना...
एकटे मला वाटत आहे..
साथ देणारी तू आज मैलो अंतरावर आहे..
आज तुझी आठवण येत आहे.....

जीवन मुक्तीच साकड देवाकडे घालतोय
हसत हसत मरण याव याची वाट बघतोय
जवळ तुझ्या आज मी येत आहे..
आज तुझी आठवण येत आहे..आठवण येत आहे...