फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, २७ जुलै, २०१०

तू जाताना म्हणालीस,

तू जाताना म्हणालीस,
"मला विसर", किती सहजतेने...
नी तू गेल्यानंतर लोटले
कित्येक काळ उदासवाणे

विसरण्याचा नाकाम प्रयत्न
करून अजून थकलो नाही
विसरायचे हे पक्के ठरवूनही
विसरू काही शकलो नाही

तुला आठवणीने विसरण्याची
रोजच चालते धडपड माझी
पण चुकवत मला एखादी
येतेच चोरआठवण तुझी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा