फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, २२ जुलै, २०११

"माझे श्वास मिटण्याआधी
एकदा येऊन भेटून जा
गळून पडलेल शरीर माझ
एकदा अंगाशी लपेटून जा....
माझ्यातल्या तुझ्या आठवणींना
एकदा येऊन समेटून जा
श्वास माझे मिटण्याआधी
फ़क्त एकदा येऊन भेटून जा"

मंगळवार, १९ जुलै, २०११

म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही ! . .


मुखवट्यांच्या पसा-यात....मलाच मी गवसत नाही....
म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही !

आतून - आतून येतात कढ
रडावसं वाटत नाही...
विनोदावर कुठल्याही
साधं हसू फ़ुटत नाही....

मुखवट्यांच्या पसा-यात...मलाच मी गवसत नाही....
म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही !

येते सर जाते सर
चिंब मन भिजत नाही...
येतो वारा घालतो घाला
रक्त काही सळसळत नाही...

मुखवट्यांच्या पसा-यात...मलाच मी गवसत नाही....
म्हणूनच आजकाल लिहावस वाटत नाही !

शुक्रवार, १ जुलै, २०११


खुश राहणार असशील तर माझी हरकत कधीच नसणार
तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

स्वप्न तुटतात मग त्रास होतो
मी आता नाही बघणार
...
विरह हा नाही सहन होत
मी आता नाही जगणार

संपवेन स्वताला
आणि तुझ्या वाटेतला काटा दूर होणार

रडू नकोस माझ्या मरन्यावर
मला सहन नाही होणार

कारण तुझे ते अश्रु पुसायला मी नसणार
कारण तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

काळजवारची जखम अजून ओलीच आहे
कारण तू तिला सुकायच वाव दिला नाहीस
एक दुख संपण्याआधी प्रतेक वेळेला
दुसरा घाव दिला आहेस...
...पण असुदे,
तू नसण्याच्या दुखापेक्षा
तू दिलेल्या जखमा तर माझ्या आहेत
तू माझी नसण्यापेक्षा तू माझीच असल्याच्या
आठवणी तर अस्तित्वात आहेत

तुला माझी आठवण येते ?


अगं
वाऱ्याची झुळूक आली कि मला तुझी आठवण येते ,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
थकलेल्या मनात ,भिजलेल्या क्षणात मला तुझी आठवण येते,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
हक्काने कुणी ओरडले कि मला तुझी आठवण येते
सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
मनात रडून खोटे खोटे हसताना मला तुझी आठवण येते ,
सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
प्रत्तेक चित्राच्या रंगात मला तुझी आठवण येते ,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
आठवणींचा विषय जरी आला तरी पण मला तुझीच आठवण येते
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

नसेन ग चांगला मी ,पण वाईट म्हणून पण का होईना
......एकदा तरी माझी आठवण काढ.......

मंगळवार, २८ जून, २०११

काही चारोळ्या

मन गुंतवायला वेळ लागत नाही..
मन तुटायला वेळ लागत नाही,

वेळ लागतो ते गुंतलेल मन आवरायला..
आणि तुटलेल मन सावरायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!



=========================================


जिच्यावर जिवापाड प्रेम केल
तीच आज परक्या सारखी वागते
पण तरीही मी हे सहन करतो
कारण स्वप्नात ति माझ्याशी प्रेमाने वागते.........!!!



=========================================


एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी विश्वास करण्यासाठी. ......
आणि.....,
आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी

अश्रूस फ़क्त कळला....ओला स्वभाव माझा
असून ही तुझा मी ....आहे अभाव माझा

दुःख्खास ही कधीची... आमंत्रणेच माझी
येता सुखास आहे...."घूम-जाव" माझा
...
मुखवटेच जरी का....ती माणसे तरीही
हा ऊम्बराही माझा....तो ऊम्बराही माझा

अब्रूस लक्तरांच्या टांगून वेशीला
किती अब्रुदार आहे !..सारा समाज माझा

हासून सुकविले मी.. अश्रु तसेच गाली
पापण्याच झाल्या ...ओला रूमाल माझा