फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, १ जुलै, २०११

तुला माझी आठवण येते ?


अगं
वाऱ्याची झुळूक आली कि मला तुझी आठवण येते ,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
थकलेल्या मनात ,भिजलेल्या क्षणात मला तुझी आठवण येते,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
हक्काने कुणी ओरडले कि मला तुझी आठवण येते
सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
मनात रडून खोटे खोटे हसताना मला तुझी आठवण येते ,
सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
प्रत्तेक चित्राच्या रंगात मला तुझी आठवण येते ,
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

अगं
आठवणींचा विषय जरी आला तरी पण मला तुझीच आठवण येते
पण सांग ना....कधीतरी तुला माझी आठवण येते ?

नसेन ग चांगला मी ,पण वाईट म्हणून पण का होईना
......एकदा तरी माझी आठवण काढ.......

मंगळवार, २८ जून, २०११

काही चारोळ्या

मन गुंतवायला वेळ लागत नाही..
मन तुटायला वेळ लागत नाही,

वेळ लागतो ते गुंतलेल मन आवरायला..
आणि तुटलेल मन सावरायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!



=========================================


जिच्यावर जिवापाड प्रेम केल
तीच आज परक्या सारखी वागते
पण तरीही मी हे सहन करतो
कारण स्वप्नात ति माझ्याशी प्रेमाने वागते.........!!!



=========================================


एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी विश्वास करण्यासाठी. ......
आणि.....,
आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी

अश्रूस फ़क्त कळला....ओला स्वभाव माझा
असून ही तुझा मी ....आहे अभाव माझा

दुःख्खास ही कधीची... आमंत्रणेच माझी
येता सुखास आहे...."घूम-जाव" माझा
...
मुखवटेच जरी का....ती माणसे तरीही
हा ऊम्बराही माझा....तो ऊम्बराही माझा

अब्रूस लक्तरांच्या टांगून वेशीला
किती अब्रुदार आहे !..सारा समाज माझा

हासून सुकविले मी.. अश्रु तसेच गाली
पापण्याच झाल्या ...ओला रूमाल माझा

शुक्रवार, २४ जून, २०११

Watch this Video & listen wording


आज मला ती अचानक दिसली..


आज मला ती अचानक दिसली..
मनात छोटीशी कळ उठली..

कधीकाळी आपलीशी असणारी..
आज किती परकी वाटली।

ढगाळ आकाश अन् सुसाट वारा..
ओढणी सांभाळत ती फार सुंदर वाटली।

डोळे भरुन तिला पाहण्याऐवजी..
माझ्याच डोळ्यात आसवं दाटली।

क्षणभर वाटलं थांबवावं तिला..
पण पुन्हा मनाला भिती वाटली।

तिच्या अनेक आठवणीँ मध्ये..
आज अजून एक आठवण साठली।

मनापासून सांगतो मित्रांनो,
आज पूर्ण दिवसाची वाट लागली।।

गुरुवार, २३ जून, २०११

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?
पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले
फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…
माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार
फ़क्त एकच प्रश्न करतो,
खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का ???




आपण जिच्यावर प्रेम करतो |
तिच्या आठवणीत नेहमी झुरतो |

डोळ्यासमोर निरागस चेहेरा तिचा येतो |
फक्त एकदाच भेटून जा एवढेच सांगून जातो |

दूर राहून कधी प्रेम कमी होत नसते |
कारण ती आपल्या हृदयात असते |

प्रेम कमी होऊ नये म्हणून महिन्यातून एकदातरी भेट होते |
क्षणभर भेटते आणि अमाप प्रेम देऊन जाते |

दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा चेहेरा डोळ्यासमोर येतो |
स्पर्श करायला हात तिच्या जवळ सरतो |

भास होत आहे हे जेव्हा मला कळते |
तिचा विरह जाणवतो आणि काळीज माझे जळते |

जीवापाड प्रेम जरी मी तिच्यावर करतो |
नियतीच्या खेळापुढे मी कसा हरतो |

आपण जिच्यावर प्रेम करतो |
पुन्हा तिच्या आठवणीत नेहमी झुरतो |

मंगळवार, २१ जून, २०११

हम्म... जरा नव्याने... खरच
नव्याने सुरुवात करावी म्हणतोय मी ....
दोन चार ओळी लिहून
काही तरी सांगावे म्हणतोय मी ...

ते पावसाचे रीमझीमणे
अन त्यातल्या कातरवेळीच्या आठवणी
पुन्हा एकदा ओठावर येतात
तीच ती विरहाचे गाणी......

रेशमी केसांच्या बटा
ती गालावरची खळी..
छ्या ... नको वाटतात
आता त्या आठवणी...

छळणाऱ्या या आठवणी
घर करून बसतात मनी...
कातरवेळ आली कि....
येतात फिरून माघारी...

शब्दातीत यांचे वर्णन...
करावे म्हणतोय मी...
दोन चार ओळी लिहून
काही तरी सांगावे म्हणतोय मी ...

बुधवार, १५ जून, २०११

मी अस नाही सांगत की प्रेम करू नका...

मी अस नाही सांगत की प्रेम करू नका... पण तिनेही कराव प्रेम म्हणुन दबाव आणु नका...

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण स्वप्न पूर्ण करताना मागे कधी फिरू नका..

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण प्रेम केलत तर सोडून कधी जाऊ नका..

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण तिच्या सुखापुढे इतर कसलाही विचार करू नका..

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..पण स्वताच्या स्वार्थासाठी तिच्या जिवाचा खेळ कधी करू नका...

 मी
 अस नाही सांगत की प्रेम करू नका..प्रेम करतोय अस दाखवून तिचा बळी तरी घेऊ नका...

सोमवार, १३ जून, २०११

ये ना परतुन प्रिये.....

तुला पाहुनच मी जगतो
स्वप्नात तुला मी बघतो
तुझ्यासाठीच जीव तरमळतो
ये ना परतुन प्रिये.....


जीव झाला एकटा
साथ नाही कुणाचा
आवाज तुला मी देतो
ये ना परतुन प्रिये....


आठव ते क्षण्
हातात हात घालुन फ़िरलेले
साद तुला मी देतो
ये ना परतुन प्रिये.....


माझ्याविना जरी तु
सुखी असली तरी
कसा मी जगतोय पाहण्यास
ये ना परतुन प्रिये.....


या वेड्या जीवाला
आस तुझीच आता
श्वास थांबण्याअगोदर
ये ना परतुन प्रिये....


सुरवात आपल्या प्रेमाची
आठवत तुला नसेल तर
शेवट माझा पाहण्यास
ये ना परतुन प्रिये.......