आपण जिच्यावर प्रेम करतो |
तिच्या आठवणीत नेहमी झुरतो |
डोळ्यासमोर निरागस चेहेरा तिचा येतो |
फक्त एकदाच भेटून जा एवढेच सांगून जातो |
दूर राहून कधी प्रेम कमी होत नसते |
कारण ती आपल्या हृदयात असते |
प्रेम कमी होऊ नये म्हणून महिन्यातून एकदातरी भेट होते |
क्षणभर भेटते आणि अमाप प्रेम देऊन जाते |
दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा चेहेरा डोळ्यासमोर येतो |
स्पर्श करायला हात तिच्या जवळ सरतो |
भास होत आहे हे जेव्हा मला कळते |
तिचा विरह जाणवतो आणि काळीज माझे जळते |
जीवापाड प्रेम जरी मी तिच्यावर करतो |
नियतीच्या खेळापुढे मी कसा हरतो |
आपण जिच्यावर प्रेम करतो |
पुन्हा तिच्या आठवणीत नेहमी झुरतो |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा