फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०

गेलीस क्षणात सोडून...


गेलीस क्षणात सोडून
ठरवलेली साथ न देऊन

गेलीस क्षणात सोडून
स्वप्नांचा तो चुराडा करून..

गेलीस क्षणात सोडून
रात्रीचे मला जागे ठेवून..

गेलीस क्षणात सोडून
डोळ्यात माझ्या अश्रू देऊन..

गेलीस क्षणात सोडून
विसरुनी जा असे सांगून..

गेलीस क्षणात सोडून
एकदाही मागे न बघून..

गेलीस क्षणात सोडून
वचन ते सहज तोडून..

गेलीस क्षणात सोडून
मृगजळाची जाणीव करून..

गेलीस क्षणात सोडून
जीव हि न राहिला तुला जाताना बघून...तुला जाताना बघून

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

एकदा मी प्रेमाला विचारले


एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे?
प्रेम मला हसून
म्हणाला..
अरे
वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

जेव्हा तुला
कोणी आवडतो..
मी
क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे...
तू विचार फक्त
माझाच करतो
कारण
मी पूर्णपणे तुझाच असतो रे........
अरे वेड्या मी
एकाच ठिकाणी नसतो
रे...

प्रेम तू कुणावरही कर....
मी तुला तिथेच
दिसणार असतो
रे....
तू प्रेम दुसर्याला जितके देशील...
त्याच्या
दुप्पट तुला
मी मिळणार असतो रे...
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

आयुष्य
खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा
जेव्हा
मला तू बोलावनार..
मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे...

बुधवार, १ सप्टेंबर, २०१०

तिने मैत्री तोडली..
ते माझ्या जिव्हारी लागले..
आणि वाट पाहता पाहता...
नजर माझी मरून गेली...

आता एकटाच आहे..
कधी कधी मागे वळून पाहत आहे...
झालेल्या चुकांचा विचार करत आहे...
आणि स्वत:लाच शिक्षा देत आहे...

झालेल्या चुकाने मन तडफडतेय...
कारण खूप वेदना होत असताना...
मला काही होत नाही असे दाखवतेय

एक वेडी आशा आहे...
परत येतील ते दिवस...
म्हणेल ती मला...
चल झालेल्या गोष्टी विसर....

पण ती वेडी आशा आहे..
स्वत:च्याच पायात पाय अडकून पडण्यासारखी..
घोर एक निराशा आहे...

येतेय का ती हे डोळे वाट पाहतील...
शेवट्च्या श्वासापर्यंत ऊघडे राहतील...
येणार नाही ती हे माहीती असून..
मरणानंतरही डोळे तिचे शोध घेत राहतील....

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

राञीनंतर उगवते, म्हणुन ती पहाट असते!
वळणावळणाची असते, म्हणुन ती वाट असते!
कलेकलेने बदलतो, म्हणुन तो चंद्र असतो!
भरती ओहोटीत भडकतो,म्हणुन तो समुद्र असतो!
क्षितीजापाशी झुकते,म्हणुन ते आकाश असते!
आसवांनी जोडले जाते,म्हणुन ते प्रेम असते!
क्षणोक्षणी रंग बदलते,म्हणुन ते जीवन असते!
सुखदुःखाची देवाणघेवाणअसते,म्हणुन ती मैत्रीअसते!!"
"

"

"

तुझ्यासाठीच जगणं आणि तुझ्यासाठीच मरणं,
हे तर माझं फक्त एक काव्य आहे….
खर म्हटलं तर, तुझ्या प्रेमासाठीच मला,
मरणानंतरही जगायचं आहे…

सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०

भेटूया का?..

भेटूया का?..
ओथंबलेल्या घनात ..
त्या रिमझिमत्या पावसात ..

नको उघडूस ती छत्री,
जरा भिजुदेत ना सरी

भेटूया का?..
झोंबत्या गार वाऱ्यात ..
त्या कोसळत्या धबधब्यात ..

घेवुन हात तुझा हातात,
जरा सावरुदेत ना खडकात

भेटूया का?..
उधळत्या सागर लहरीत ..
त्या बांधावर छत्रीत ..

सामावत तुझ्या मिठीत,
जरा लाजुदेत ना खळीत

शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी
तुला हसतं पाहण्यासाठी,तुझी आस्व पुसण्यासाठी
तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा "

तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे,
माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे"

मग कसं कोण जाने,ती माझ्या मिठीत विरून गेली,
विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!!

आता मी मी राहिलो नव्हतो,न ती ती उरली होती
दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती..

मग न जाने का , नजर माझीच लागली .....

मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली
अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत

त्या भाबडीने हात तिचा कापला होता ..
मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता...

पुन्हा येऊन पाहून जा ग
पत्रिका आहे आपल्याच लग्नाची ..
सोंग केलं होतं ग मी सारं...
फक्त तुला जळवण्यासाठी ..
ग प्रिये थोडं जळवण्यासाठी..

आज तिच्या प्रेतासोबत
माझंही प्रेत जळतंय...

जीव सोडला आहे....
तरीही काळीज रडतंय...
काळीज रडतंय........

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

मी स्वतः तुझ्यावर केलेली लास्ट कविता

कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झालीस काही कळलेच नाही..

एक एक दिवस जात होता .. अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती ..


कदाचित तुला मी वेडा वाटत असेन.. अन होय मी वेडाच आहे तुझ्याच साठी..
तुझ्या एका प्रेमळ कटाक्षासाठी.. तुझ्या प्रेमळ मिठी साठी..


पण कदाचित ते शक्य नाहीये ... तुला ...

शेवटी मनाला घटत आवळून तुही बुद्धीनेच निर्णय घेतलास ना..!!


आपल ते प्रेम , आपल्या त्या आठवणी..
येवढ्या सहज तू विसरू शकशील..?

कदाचित हो असेल तुझ उत्तर...

पण मनातल्या त्या एकांत कोपरयात माझी जागा कायम असेल
हेही मी जाणतो..


होईल तुलाही कधी तरी पश्चाताप होईल कि ऐकल असतं जर तेव्हाच मनच तर..

पण वेळ गेल्यावर काय करणार..

त्यावेळी कोणाला सांगावस वाटल तरी तुला ते शक्य नाही होणार..!!


आयुष्याच्या एखाद्या वळणावर कदाचित आपली भेट होईलही ..

पण त्यावेळीही मला हेच जाणून घेण महत्वाच असेल कि

कि

कि

तू खुश तर आहेस ना!!

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०१०

एक ज्योत वातीला नेहमी साथ करणारी 
जीवात जीव असेपर्यंत साथ कधी न सोडणारी 
पण अचानक एक वादळ आल आणि-
पणती धक्यावरून खाली कोसळली 
पणतीचे त्या तुकडे झाले 
ज्योत तर वातीला केव्हाच सोडून गेली 
पण त्या उध्वस्त तुकड्यांमध्ये 
वांत अजूनही वाट पहात होती 
पुन्हा एकदा ज्योत त्याच्याजवळ येईल म्हणून 
जमिनीवर सांडलेल्या तेलाने स्वताला चिंब 
भिजवून घेत होती.

प्रेम म्हणजे काय ?


प्रेम म्हणजे काय?
प्रेम कसं होत?
कोणी उत्तर देईल का,
 
प्रेमाची भाषा काय असतं
प्रेम हे डोळ्याने सुरवात होऊन 
 ते हृद्यापर्यात पोचते ते प्रेम का?
 
प्रेम हे काय असतं,
जे आपण आई-वडिलावर करतो ते,
की जीवनाच्या वाटेवर आपल्याला
एका स्वप्नाच्या दुनियामाधला एक सोबतीवरच ते प्रेम का,
 
प्रेम म्हणजे काय?
कोणी सागू शकत का?
प्रेम हे फुलाच्या पाकळ्याप्रमाणे असते ते प्रेम का,
प्रेम हेकमळाचे  चिखलावर असते ते प्रेम का,
प्रेम हे मधमाशी चे फुलाच्या मधावर असते ते प्रेम का?
प्रेम हे युगाप्रमाणे चालत आल ते प्रेम का?
कोणी सागू शकत का?
 

बुधवार, २५ ऑगस्ट, २०१०

फक्त तुझ्यासाठी.....

आयुष्य असेच सरले, धावत आठवणींच्या पाठी 

सबंध आयुष्य वाट पहिली, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्या येण्याची वाट पाहत, शब्द गोठले आज ओठी
ह्रुदयात दुःखाचे भास कवळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

जगलो असा की मी, जगणे राहून गेले पाठी
डोळ्यातले अश्रु ह्रुदयात कोंडले, मी फक्त तुझ्यासाठी.....

हर घडी तुझ्या प्रेमाची, मनात ठेवली आस मोठी
त्या आशेवर जगत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्याच समोर झुकते मन, हे मन ही आहे फार हट्टी
याच हट्टावर आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्यासाठी.....

नाशिबाशी झगडत झगडत, न तोड़ता प्रेमाच्या गाठी
त्या गाठीना सामभालुन, ठेवले मी फक्त तुझ्यासाठी.....

एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा, आज माझ्या डोळ्यात दाटी
त्या क्षणानना उराशी कवटाळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

अंधार विजत उजेड यावा, भान विसरून जूळावि मीठी
याच स्वप्नांना आयुष्य समजलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझीच वाट पाहत, जळले ह्रदय प्रेमाकाटी
भिन्न दिशांना झुरत, राहिलो मी फक्त तुझ्यासाठी.....