एक ज्योत वातीला नेहमी साथ करणारी
जीवात जीव असेपर्यंत साथ कधी न सोडणारी
पण अचानक एक वादळ आल आणि-
पणती धक्यावरून खाली कोसळली
पणतीचे त्या तुकडे झाले
ज्योत तर वातीला केव्हाच सोडून गेली
पण त्या उध्वस्त तुकड्यांमध्ये
वांत अजूनही वाट पहात होती
पुन्हा एकदा ज्योत त्याच्याजवळ येईल म्हणून
जमिनीवर सांडलेल्या तेलाने स्वताला चिंब
भिजवून घेत होती.
khup sundar kavita aahe hi...
उत्तर द्याहटवा