फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

एकदा मी प्रेमाला विचारले


एकदा मी प्रेमाला विचारले
कुठे कुठे तू असतोस रे?
प्रेम मला हसून
म्हणाला..
अरे
वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

जेव्हा तुला
कोणी आवडतो..
मी
क्षणात तुझ्या हृदयात शिरतो रे...
तू विचार फक्त
माझाच करतो
कारण
मी पूर्णपणे तुझाच असतो रे........
अरे वेड्या मी
एकाच ठिकाणी नसतो
रे...

प्रेम तू कुणावरही कर....
मी तुला तिथेच
दिसणार असतो
रे....
तू प्रेम दुसर्याला जितके देशील...
त्याच्या
दुप्पट तुला
मी मिळणार असतो रे...
अरे वेड्या मी एकाच ठिकाणी नसतो रे...

आयुष्य
खरच खूप सुंदर आहे..
माझा हात सोडून देऊ नकोस रे......
जेव्हा
जेव्हा
मला तू बोलावनार..
मी तुझ्याच हृदयात लपून असतो रे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा