फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, ९ ऑगस्ट, २०१०

काही आठवणी विसरता येत नाहीत


काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत

अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत

गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत

नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत

शनिवार, ७ ऑगस्ट, २०१०

तरीही का कोणास ठाऊक असं वाटतं..

कळतं कुठूनतरी तू होतीस जवळ कुणाच्यातरी 
अलगद तुझा स्पर्श झाला कुणालातरी 
असेल त्याच्यासठी कदाचित तो प्राजक्त 
पण,माझ्यासठी जळणारा कोळसा फक्त 

असो,नशिबातच नसशील तू माझ्या कदाचित 
चंद्र आणि एखादी चांदणी जवळ असल्याचे 
आभास होत राहतात पृथ्वीवरून 
मात्र, प्रत्यक्षात असतं काही कोटी मैलांचं अंतर 

दुःख एवढच बोचतं की,
असे आभासही नाहीत आता आपल्यात 
आणि मनामनातली अंतरंतर मोजमापनाच्या पलीकडची !!! 

तरीही का कोणास ठाऊक असं वाटतं...

थोडे देऊन, ठेऊन थोडे जातो पाऊस

मनात झालि गर्दी जेव्हां आठवणींची
कातरवेळी रिमझिम होती कैक क्षणांची
त्यातील काही हळवे अंगण भिजवून गेले
आणि, उरले सुरले नुसते वाहून गेले
असेच होते जेव्हां जेव्हां येतो पाऊस
थोडे देऊन, ठेऊन थोडे जातो पाऊस

आठवते मग भिजलेली ती नाजुक वेळ
हातामधे हात गुंफण्याचा तो खेळ
किती सरी मग रिमझिम करुनी जातात
कुणास ठाऊक, किती अंगभर रहातात
असेच होते जेव्हां जेव्हां येतो पाऊस
थोडे देऊन, ठेऊन थोडे जातो पाऊस

आठवण...... न संपणारा प्रवास

तिची आठवण
एक न संपणारा भास.

तिची आठवण
एक दोघांचा विश्वास.

तिची आठवण
एक जगण्याचा श्वास.

तिची आठवण
एक स्मृतिलाच ध्यास.

तिची आठवण
एक ह्र्दयातला वास.

तिची आठवण
एक आठवणीची आरास.

तिची आठवण
एक अश्रुची भड़ास.

आठवण.......... ?

आठवण ठेउन ठरवले
तिला आता आठवायचे नाही.

कारण..........

तिच्या सोबतचे क्षण न क्षण
सोडत नाहीत आठवणी.

आज मात्र क्षण न क्षण
टोचत राहातात आठवणी.

वेळेच भान न ठेवता 
भिडस्तपणे येतात तिच्या आठवणी.

मग, मीही भीडभाड न ठेवता 
घुसतो तिच्या आठवणीत.

मोरपंखा सारख्या अलगद
येतात तिच्या आठवणी.

मग, दिवसभर मला,
ओरबाडत राहातात तिच्या आठवणी.

म्हणुनच..........

आठवण ठेउन ठरवले
तिला आता आठवायचे नाही.

पण.....

तिची आठवण एवढी कोरल्या गेलीय,
काय ठरवले तेच आता आठवत नाही.

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०१०

सोडले मी


मैफिलीत तुजीया येणे सोडले मी
घेतल्या जखमांना उकरणे सोडले मी |

ऋतूचक्रात माझ्या पाऊस नुरला काही
तुला साद घालणे आता सोडले मी |

रंग मेहेन्दिचे तुझ्या हातावरी सजले जेंव्हा
मी माझे तुझ्यात रंगणे सोडले मी |

आठवात तुझ्या हे जीवन आहे जायचे
आताशा हळू हळू मरणे सोडले मी |

आहे आयुष्य अजूनही पुढे बाकी;
"बेदील" करून तुला, वाहने सोडले मी |

ती आहे,,,,,,, पण ती दूर आहे


तिचा विचार करून
रात्र रात्र जागता येतं
ती आत्ता हवी म्हणून
वेड्यासारखं वागता येतं
हिरमुसुन मन कधी
खूपच खट्टू होतं
ती जवळ नसल्याचं शल्य
बिकट घट्ट होतं
नुसता स्वतःशीच संवाद
आता नको आहे
ती आहे
पण ती दूर आहे

तुझी खूप आठवण येते
फोनवर सांगता येतं
तसे सांगितले तर तिचही
मन लगेच हळवं होतं
ती फोनवरच म्हणते
कधी भेटशील रे?
श्वास दीर्घ होतो दोघांचा
वाहू लागते उष्ण वारे
किती वेळ बोलता येणार
शेवटी फोन ठेवावा लागतो
मोठ्ठा दगड हृदयावर
रोज रोज घ्यावा लागतो
बोलायचे राहून गेलेले
किती अव्यक्त आहे
ती आहे
पण ती दूर आहे

बुडतो आहे मी!!!

पाणावलेले डोळे 
ओलावलेल्या पापण्या 
कशा व्यक्त करू मी...
...दाटलेल्या भावना? 

भावनांचा पूर 
दाटून आलेला उर 
मन...सैरभैर...
जसं आत्म्याशीच वैर! 

वाहत होतीस तू 
वाहत आहे मी !!
तीरावर थांबलेली तू 
बुडतो आहे मी!!!

प्रेम म्हणजे.....

प्रेम म्हणजे निरभ्र आकाश,
निर्मल, निरपेक्ष भावनेने व्यापलेले....
एक भला चंद्रमा, 
त्याच्या प्रकाशाने चांदण पडलेल....!!

प्रेम म्हणजे अथांग समुद्र, 
डोळ्यांचीही मजल ना पोचलेला....
नावेवरचा एकच नावाडया, 
अंतरी दूर पोहचलेला....!!

प्रेम म्हणजे निसर्ग, 
हिरवा शालू पांघरलेला....
धरतीच्या मिलनासाठी, 
वरुणराजा बरसलेला....!!

मरणाला मरणाची भिती वाटावी

मरणाला मरणाची भिती वाटावी
मरणवाट ती मला भेटावी......

काळजात काळजाची स्पंदन घोटावी
आयुष्याची सरती वर्ष हळूवर लोटावी 

कळुन ती न कळावी
रीत अशी ऊरी बाळगावी 

नेहमी वाट नवी शोधावी 
हुरहुर ती नवी अनुभवावी 

पुरुन ऊरनार ती आठवण जपावी 
दुःखातही जी भरभरुन हसावी