फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शनिवार, ७ ऑगस्ट, २०१०

थोडे देऊन, ठेऊन थोडे जातो पाऊस

मनात झालि गर्दी जेव्हां आठवणींची
कातरवेळी रिमझिम होती कैक क्षणांची
त्यातील काही हळवे अंगण भिजवून गेले
आणि, उरले सुरले नुसते वाहून गेले
असेच होते जेव्हां जेव्हां येतो पाऊस
थोडे देऊन, ठेऊन थोडे जातो पाऊस

आठवते मग भिजलेली ती नाजुक वेळ
हातामधे हात गुंफण्याचा तो खेळ
किती सरी मग रिमझिम करुनी जातात
कुणास ठाऊक, किती अंगभर रहातात
असेच होते जेव्हां जेव्हां येतो पाऊस
थोडे देऊन, ठेऊन थोडे जातो पाऊस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा