फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, ६ जुलै, २०१०

जातेस जर तू माज्या पासून लांब सोडून मला

जातेस जर तू माज्या पासून लांब सोडून मला ,

तर परत माज्या कडे येऊ नको ,
हे पण शक्य नाही कि मी वळू शकतो
म्हणून एवढ वचन दे कि मला परत आवाज देऊ नको ......

जातेस जर तू माज्या पासून लांब,
तर परत माज्या कडे येऊ नको ,

मिळालो जरी मी तुला रस्तात
तर फिरून घे तुजी नजर पण मिळवू नकोस
आणि जर चुकून बघितलं तर डोळ्यात पाणी नको आणूस
हृदयातून तर केलंच आहे वेगळ मला
पण डोळ्यातून मला खाली उतरू नकोस

तू मागितलं भेटू दे सर्व सुख मला
पण माज सुखाच तू आहे मग ते का नाही मिळालं

तू दिली आहे शपत कधी दुख करू नकोस
तू म्हणतेस माजी आठवण नको काढू मग एवढ वचन दे मला तू पण माज्या स्वप्नात येऊ नको


विरह तिचा

कसा सहन करू विरह तुझा 
येतेस तू पुन्हा माझिया मना 

नको आहे पुन्हा आठवण त्या क्षणाची 
मीठ चोळून जाते जी खपली निघालेल्या हर एक जखमेवरची 

सततचे मरण आता नको आहे 
दिलेला प्राण तुला 
पाण्यातून बाहेर काढलेल्या माश्यासारखा तडफडत आहे 

बस्स्स्सस्स्स्स झाले देवा आता 
कंटाळलो आहे आता ह्या जीवनाला 

फक्त एकदाच पाठव तिला 
पण फक्त ते तिला दिलेले प्राण पुन्हा माझ्यात सोडायला

शुक्रवार, २ जुलै, २०१०

तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस


तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे

फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस

एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही

मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही

मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस

मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस

बरंच काही निघून गेलयं तरीही मी उभाच आहे,
अर्थ सर्वच संपून गेलाय तरीही जीवन सुरुच आहे

वेळ केव्हा निघून गेली मला कधी कळलेच नाही
कळले जेव्हा मला तेव्हा हाती काहीच उरले नाही

आता सर्व शांत झालयं वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता श्रावणानंतर होत तसं

तरीही,

तरीही बरंच काही शिल्लक आहे अजून माझ्या हाती,
काही शण अजूनही आहेत फक्त माझ्यासाठी...

त्यावरच तर जगतो आहे
हसतो आणि रडतो आहे

एकच गोष्ट फक्त मी माझ्याकडची हरलो
प्रत्येक शणी आजही मी फक्त तुझ्यासाठी झुरलो

आजही मला एकच फक्त सांगावेसे वाटते
आयुष्याच्या या शणीही 

तुझी उणीव भासतेय
तुझी उणीव भासतेय......

काही चारोळ्या ....

"तुला माहिती आहे देवाने असे का केले की आपल्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे दिले पण हृदय मात्र एकच दिले ??............ कारण ह्या पृथ्वीवर येऊन आपण आपल्या आवडीचे दुसरे हृदय शोधावे म्हणून. ♥ "


==================================================


"प्रेयसीला wedding ring पाहिजे होती, पण प्रियकर तिला teddy-bear देतो, त्या रागा मधे ती मुलगी तो teddy रस्त्यावर फेकून देते, प्रियकर तो teddy आणण्यासाठी रस्त्याआवर जातो पण मागून येनारि गाडी त्याला जोराने उडवते व तो जागच्या जागीच मरतो, त्याच्या अन्तविधिच्या वेळी, ती प्रेयसी तो teddy रडत रडत घट्ट आवळते, तेव्हा त्या teddy मध्ये असलेल्या machine मधून आवाज येतो " प्रिये माझ्याशी लग्न करशील ? ही बघ wedding ring माझ्या (teddy-bear च्या) खिशात आहे "


==================================================


"तू माझ्यासाठी दारूच्या नशेसारखी आहेस, जेव्हा तू माझ्या बरोबर असतेस तेव्हा मी पूर्ण नशेत असतो, जेव्हा नसतेस तेव्हा मी बेचैन होतो, आणि जरी मला माहिती आहे की अखेरीस तू मला hurt करशील, मला दुख देशील, कदाचित ज्यामुळे माझा प्राण ही जाईल,................... पण तरीही मला तू पाहिजेस, कारण मी तुझ्या आधीन झालो आहे"


==================================================


"जर तुझे रक्त मला वाचवू शकते, तर मी तुझ्याकडे रक्ताचा एक थेंब मागेन,
जर तुझा आवाज मला वाचवू शकतो, तर मी तुझ्याकडे एक शब्द मागेन,
पण जर तुझे आश्रू मला वाचवू शकतात, तर मी तुला राडताना बघण्याएवजी मी स्वतहा मरणे पसंद करेन ♥ "



==================================================


"तुझ्या डोळ्यातील इवलासा अश्रू
मला समुद्राहून खोल वटला
कारण मीचं होतो म्हणून
माझ्या डोळ्यात समुद्र दाटला "



==================================================


हातात हात घेशील जेव्हा
भीती तुला कशाचीच नसेल
अंधारातला काजवाही तेव्हा....
सूर्यापेक्षा प्रखर असेल



==================================================


"प्रेम हे फुलपाखरासारखे असते ♥ , जेव्हा तुम्ही त्याला पकडायला जाता, ते दुसरीकडे उडते, पण जेव्हा तुम्ही काही न करता स्तब्ध उभे रहाता, तेव्हा ते येते आणि तुम्हाला स्पर्श करते ♥ ....
म्हणून प्रेमाच्या मागे धावण्यापेक्षा वाट पाहुयात आपल्या आपल्या फुलपाखराची ...
नाही का ?'




गुरुवार, १ जुलै, २०१०

...तेव्हा काय करावे?


सगळेजण भोवती असुनही एकट वाटतं तेव्हा काय करावे? 

कोणाशी बोलावसे वाटुनही बोलता येत नाही तेव्हा काय करावे? 

मनाचा बांध फुटतोय, रडावसे वाटते तरी रडता येत नाही तेव्हा काय करावे? 

एखादी गोष्ट करावीशी वाटते पण करता येत नाही, कोणी करु देत नाही तेव्हा काय करावे? 

स्वत:च्या प्रतिमेत अडकले असेल तेव्हा काय करावे....?

बुधवार, ३० जून, २०१०

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...
कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवणारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.........
माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा...
पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय..
जीवनाच्या वळणांवर वेगळेचं रंग रंगवणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी......

शुक्रवार, २५ जून, २०१०

बरेच शब्द जोडले, लिहून पुन्हा खोडले
अर्थांचे किती वलय हवेमधे सोडले,
पण हळूवार मनासारखा हळूवार शब्द
सापडतच नाही मग लेखणीही स्तब्ध

अस कठीण आहे तिच्याबद्दल लिहीणं
फूलपंखी मनाला शब्दांमधे पाहाणं
दोन क्षणांसाठी मी तिच्या मनात राहतो
जरा डोळे मिटून काही सूचतं का पाहतो

तिचं एक जग आहे..आपल्यासाठी बनवलेलं
साध्या सरळ कल्पनेने फ़क्त तिने सजवलेलं
 
तिथे फ़क्त प्रेम आणि बंधांमधे जगणं
आपल्याआधी दूसरयांच्या भावनांना बघणं,
रांगोळ्यांच्या रेषांमधे तिथे हरवून जाणं
कल्पनेचं चित्रातून बहरून य्रेणं
कधीतरी सहजच खोडकर होणं
आणि क्षणामधे आपल्यातच हरवून जाणं

फूलांचे रंग आणि कितीतरी गंध
मनातल्या अंगणात हजारो छंद

गरजेला सहजच मदतीचा हात
भावनेच्या भरातही कणखर साथ

कुठलंही नात असं सांभाळून घेणं
शब्द जसा सूरांमधे मिसळून जाणं

तिच्यासवे चालताना पाऊल सहज टाकून द्यावं
आनंदाचे पसरून पंख विश्वासाने झोकून द्यावं

तिच्यासारखेच साधे शब्द साधाच त्यांचा अर्थ आहे
तिचा खरेपणा त्यांच्यात निरागसतेचा स्पर्श आहे

तिच्या मनातून निघताना एकच गोष्ट कळत नाही
तिच्यासारखं सुंदर मन सगळ्यांनाच का मिळत नाही
एखाद्या दिवशी जर तुला रडावसं वाटलं
तर मला हाक मार
मी वचन तर देत नाही की...
मी तुला हासवेन...
पण मी तुझ्यासंगे रडू तर शकतो...

एखाद्या दिवशी तुला कोणाचेच एकायचे नसेल
मला बोलव आणि...
मी वचन देतो की...
मी शांत राहीन...

पण एखाद्या दिवशी तु बोलवलेस
आणि काहीच ऊत्तर मिळाले नाही तर...
माझ्याकडे त्वरीत ये...
कदाचीत मलाच तुझी गरज असेल...