फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, २५ जून, २०१०

बरेच शब्द जोडले, लिहून पुन्हा खोडले
अर्थांचे किती वलय हवेमधे सोडले,
पण हळूवार मनासारखा हळूवार शब्द
सापडतच नाही मग लेखणीही स्तब्ध

अस कठीण आहे तिच्याबद्दल लिहीणं
फूलपंखी मनाला शब्दांमधे पाहाणं
दोन क्षणांसाठी मी तिच्या मनात राहतो
जरा डोळे मिटून काही सूचतं का पाहतो

तिचं एक जग आहे..आपल्यासाठी बनवलेलं
साध्या सरळ कल्पनेने फ़क्त तिने सजवलेलं
 
तिथे फ़क्त प्रेम आणि बंधांमधे जगणं
आपल्याआधी दूसरयांच्या भावनांना बघणं,
रांगोळ्यांच्या रेषांमधे तिथे हरवून जाणं
कल्पनेचं चित्रातून बहरून य्रेणं
कधीतरी सहजच खोडकर होणं
आणि क्षणामधे आपल्यातच हरवून जाणं

फूलांचे रंग आणि कितीतरी गंध
मनातल्या अंगणात हजारो छंद

गरजेला सहजच मदतीचा हात
भावनेच्या भरातही कणखर साथ

कुठलंही नात असं सांभाळून घेणं
शब्द जसा सूरांमधे मिसळून जाणं

तिच्यासवे चालताना पाऊल सहज टाकून द्यावं
आनंदाचे पसरून पंख विश्वासाने झोकून द्यावं

तिच्यासारखेच साधे शब्द साधाच त्यांचा अर्थ आहे
तिचा खरेपणा त्यांच्यात निरागसतेचा स्पर्श आहे

तिच्या मनातून निघताना एकच गोष्ट कळत नाही
तिच्यासारखं सुंदर मन सगळ्यांनाच का मिळत नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा