घेतलीय भरारी मी.....!
घेतलीय भरारी मी आता
क्षितीज नवे गवसण्यासाठी
सगळे स्वप्ने चिमण्या डोळ्यामध्ये साठवून
सगळ्या आकांक्षामध्ये नव्याने रंग भरून
पंखाना जखम झाली म्हणून काय
पक्षी उडण सोडून देतात?
नव्याने पंखात भरून जोम पुन्हा उडू पाहतात.....
असेल अस तर....
ठेच लागली म्हणून
मी का चालण सोडव?
दुखावलं कोणी मन म्हणून
भावनांशी नात का तोडाव?
मलाही वाटतंय आता नव्याने
शब्दांशी नात जोडावं
परत एकदा भावनेचे बोट
धरून काही जिव्हाळ्याच लिहावं
शब्दाने तर जग जिंकता येत ना....
मग शब्दांपासून का नाही काही शिकावं?
कारण म्हणतात,
"कुणाचंच कुणावाचून अडत नाही,
मग पाखर का पंखावाचून उडत नाही?"
तसंच,
शब्दावाचून माणूस घडला,
असंही कधी घडत नाही....!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा