वाट पाहत कुणीतरी
म्हणूनच जाण्यात मजा आहे
ऐकत असत कुणीतरी
म्हणूनच गाण्यात मजा आहे
जुनीच पत्र पुन्हा पुन्हा
वाचत असत कुणीतरी
दिवे सगळे विझल्यावर
जळत असत कुणीतरी
त्याच खिडकीत चंद्र होऊन
टपटपण्यात मजा आहे
स्वप्नात येत कुणीतरी
म्हणूनच झोपण्यात मजा आहे
ऐकत असत कुणीतरी
म्हणूनच गाण्यात मजा आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा