अजून देखील जपून ठेवला आहे...
तू जाताना दिलेला तो तुकडा कागदाचा....
पत्र तरी कसं म्हणायचं त्याला....
साधा उल्लेख देखील नाही केलास माझ्या नावाचा....
सगळी शब्द त्यातली
आठवत नाहीत मला नीटशी.....
पण एक आठवतं...... पापण्याआड लपून,
माझ्यासोबत वाचणाऱ्या, माझ्या आसवांचा....
माझ्या आधीच तोल गेला,
भिडले जाऊन त्या कागदाशी...
नेमके त्याच जागी, जी तेव्हा होती कोरी....
जिथे तू नेहमी लिहायचीस........." फक्त तुझीच "
===================================================
अजून ही जपून ठेवला आहे
तू पाठवलेला तो शेवटचा SMS
call करून माझा आवाज ऐकण्याची
हिम्मत उरली नसेल तुझ्याकडे....
आवाजातली आर्तता...
हुंदक्यांची तीव्रता....
अन श्वासातील अधीरता...
शब्दात मांडता येत नाही, किती सहजपणे विसरलीस तू.....
एक वर्षाच्या नात्याचा, दोनच ओळीत
आरंभ आणि शेवट ही केलास अन....
शेवटी लिहिलेस ते दोन शब्द......"काळजी घे "...
त्यापेक्षा "काळाने जीव " घेतलेला बरा......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा