फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शनिवार, १० जुलै, २०१०

ही एक तुझ्याचसाठी.....

तुझं काय ग, तू येऊन पुन्हा जाशील...
सुखावलेल्या जखमांवरच्या खपल्या पुन्हा काढून जाशील ...!

तू दिलेल्या जखमा सुद्धा आता हव्या हव्याश्या वाटतात,
कदाचित त्याच जखमांमुळेच तुझ्या आठवणी ताज्या राहतात....!

तू स्वतःबद्दल किती सहजच सांगून गेलीस, माझ्याबद्दल ऐकायचं विसरून गेलीस,
माझं हृदय तर घेऊन गेलीसच, पण तुझं मात्र द्यायचं विसरून गेलीस...!

आजही तुझी कमी माझ्या जीवनात मला भासतेय,
तुझ्याशिवाय माझे जीवन हे व्यर्थच आहे असेच मला सारखे वाटते......!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा