फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, २७ एप्रिल, २०११


तू निघून गेल्याच दुख नाही
तुझ्यावर प्रेम केल्याच सुख आहे
तुझ्याविना जगण असह्य आहे
परंतु इतरांसाठी जगण कर्तव्य आहे

खूप काही सांगायचं होत तुला पण,
मनातलं मनातच राहून गेल.
सुखाच घरट बांधण्या आधीच
पाखरू रानातल उडून गेल.......!!!

सोमवार, २५ एप्रिल, २०११


मलाही वाटायचं...
मलाही वाटायचं...तुझ माझ्यावर खुप प्रेम असावं.
तुझ्या डोळ्यात ते मला दिसावं..
मलाही वाटायचं...
तुझ्याबरोबर खूप काही बोलावं..
मग खूप वेळ बोलून थोडा वेळ शांत राहावं
मलाही वाटायचं...
तू मला जवळ घ्यावं,
मिठी मारून मला घट्ट धरावं.,
मलाही वाटायचं...
तुझ्या मिठीत मी सर्व विसरावं आणि,
फक्त तुलाच आठवावं..
मलाही वाटायचं...
तुझ्याबरोबर खूप भांडावं..
मग भांडण मिटवून, परत गोड व्हावं..
मलाही वाटायचं...
तुझ्या सुखात शामिल होवून जावं.. मग
तुझ्यापेक्षाही तुला खूप सुखं द्यावं..
मलाही वाटायचं...
तुझ्या दुःखात तुझ्याबरोबर रडावं.. मग
ते माझ्यावर घेवून परत तुला हसवावं..
मलाही वाटायचं...
तुझ्याबरोबर एकत्र बसून जेवावं..आणि,
जेवण माझ्या हाताने तुला भरवावं..
मलाही वाटायचं...
तुझ्या सोबत माझ नाव जोडलं जावं..आणि,
ते नाव सर्वांनी एकत्र घ्यावं..
मलाही वाटायचं...
तुझा हात पकडून घरी सोडायला जावं,
तू गेलीस कि तोच हात घेवून मी परत मागे यावं
मलाही वाटायचं...
आजही मी तुझ्यावर येवून अडतो,
तुझ्या आठवणीनी रडू आल कि अश्रू अडवून धरतो,..
तोल सुटला कि स्वताला सावरण्याचा प्रयन्त करतो,
तू तर जीव घेवून निघून गेलीस,
पण आजही जीव जावून रोज आसचं जगण्याचा प्रयन्त करतो.....

सोमवार, ११ एप्रिल, २०११

कधी काळी सदैव माझ्यासोबत राहणारी,
 
तर कधी माझ्या नजरेला नजर देणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....


कधी काळी माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडणारी,तर कधी माझ्या स्पर्शानी मोहरून जाणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....


कधी काळी माझा तोल जाताच मला सावरणारी,तर कधी इतर मुलीँकडे पाहिले म्हणून रुसणारी,ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी मला आनंदी पाहूऩ समाधानी होणारी,
तर कधी मला दु:खी पाहून अश्रु ढाळणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी  हा जन्म तुझ्यासाठीच घेतला  असे म्हणनारी,तर कधी मरेपर्यँत तुझीच राहील असे वचन देणारी,ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....

कधी काळी मी सिगारेट ओढली म्हणून अबोला धरणारी,तर कधी मी दारू प्यालो म्हणून माझ्याशी भांडणारी,
ती आज मात्र त्याच्यासोबत निघून गेली.....


कधी काळी त्या व्यसनांपासून दूर रहा असा सल्ला देणारी,
तर कधी त्या व्यसनी मित्रापासून दूर रहा अशी सक्त ताकिद देणारी,

ती आज मात्र 'त्याच' मित्रासोबत निघून गेली....

मुंग्यांच मुंग्या सगळीकडे झाल्या
नजर उचलून समोर पाहीलं 

रस्त्याच्या कडेला
एक प्रेत पडलेलं..
कुण्या मजनूचं..
साचून राहीलेल्या
अव्यक्त कवितांचं..

तरी कितीदा 
सांगितलं होतं
नकोस लिहू जीवघेणं
काळजाला घरं पडणारं.
नकोस लिहू इतकं जहरी
क्षणोक्षणी डसणारं..

शेवटी व्हायचं तेच झालं
लेखणीचा स्पर्श झाला
आणि आभाळ फाटलं..

आता या पावसात..

ओलेसे शब्द, डोळ्यांतलं पाणी
आणि छिन्नविढिन्न मन 
कसं जळणार............ 
ती हसरं टपोरं गुलाब ,
जितकं नजरेत साठवावं ,
तितक अपूर थोड फार ...!!

ती पावसाची चाहूल देत ,
बेधुंद वाऱ्यावर नाचणारी मोर ,
लाजरी तरी बेभान वेडी पोर ...!!

ती पौर्णिमेचा पुर्णगोल चंद्र ,
असले हजारो डाग त्यावरी तरी ,
अस्सल सौंदर्य त्यातच दडलेलं ...!!

गुरुवार, २४ मार्च, २०११

तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता,
तिच्या राधारूपी मनाचा वेगळाच कृष्ण होता.
तिच्या कक्षाच अमर्याद होत्या अन वेगवान गती,
माझे क्षितिजच होते तोकडे, अगदी हाताच्या अंतरावरती,
अन जीवनात चालण्याचा मार्गही भिन्न होता.
पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

तिच्याकडे बुद्धी होती, चातुर्य होतं,
रुपाची अन धनाची तर श्रीमंती होती,
माझ्याकडे बुद्धी सोडून इतर सगळ्याची नापसंती होती,
मग का वळवावे मत तिने तिचे,
हा परखडतेचा बाण तिचा तीष्ण होता.
पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

यावे तिने कधीतरी अन बोलावे जरा गोड,
हसताना दाबावी लाजेने डाळिंब फोड,
द्यावा हातात हात, सांगावी जन्माची साथ,
पण ती बुद्धीनेही जरा हुशार होती व्यवहारात,
तिने कसे मावावे माझ्या तुटपुंज्या प्रवाहात(पगारात),
समजत होते सारे तरी प्रीतीचा भाव मनी सूक्ष्म होता.
पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

मी कवटाळायचो जेव्हा तिच्या आठवांना,
ती वेगळ्याच बाहुपाशात असायची,
खरंतर मी संपायचो साऱ्यातून जिथून,
तिथून तिची सुरुवात व्हायची.
ती कोमलस्पर्शी, नाजूक नयनी,
सुवर्णकांती अप्सरा माझी नव्हती,
हा वास्तव मला मान्य होता.
पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

बुधवार, १६ मार्च, २०११


हवेच्या झुळ्केसारखी जीवनात माझ्या आलीस 
मला न कळतंच मला सोडूनही गेलीस 

रडत असताना तूच माझे अश्रू पुसलेस,
हास्य जेव्हा आले ओठावर तूच मला रडवलेस,

तुटलेला असताना तूच मला सावरलेस....
तुज्यावर विश्वास ठेवला आणि तूच मन माझे तोडलेस...

तू चांगली बनून माझ्या मदतीला आलीस....
मला न कळताच मला मोडूनही गेलीस,

भावनाशुन्य असताना मनाला स्पर्श केलास,
माझे मन बदलले तू मात्र भावनाशुन्य बनलीस...

सुकलेल्या मनावर तू प्रेमाचा पाऊस पाडलास 
मन माझे बहरले तू मात्र वृक्ष तोडीला लागलीस,

तू आपलं म्हणून माझ्या आयुष्यात शिरलीस 
मला न कळताच मला परकाही करून गेलीस