फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, २६ जुलै, २०१०

आता तु नाहीस म्हणून काय झाले........


आता तु नाहीस म्हणून काय झाले
तु दिलेल्या आठवणी तरी आहेत
तुझ्या बरोबर राहीलेल्या
प्रत्येक क्षणाच्या जाणिवा तरी आहेत

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझा हसरा चेहरा सदैव मनात आहे
तुझ्या अस्तित्वाच्या सावल्यांच्या
पाऊलखुणा तरी आहेत

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझ्याबरोबर पाहिलेली स्वप्नं तरी आहेत
त्याच स्वप्नांच्या नगरात जायची
माझी वाट तरी मोकळी आहे

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझ्याकडून मिळालेली प्रेरणा तरी आहे
याच प्रेरणेच्या जोरावर
आज उंच भरारी घेत आहे

आता तु नाहीस म्हणून काय झाले
तुझा शब्द न् शब्द कानात घुमत आहे
गर्दीत उभा राहूनही एकट्यानेच
तुझीच वाट पहात आहे ....

सांग आठवण आली की काय करायचे?


नाते तुझे हळुवार जपायचे,
आठवण आली की अलगद उमलायचे,
नको करूस अट्टाहास, सांग कधी भेटायचे,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे, तु फक्त हो म्हणायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?

मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे,
या वेडयामनाला कोण समजावयाचे?
सांग आठवण आली की काय करायचे?

तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे.
मनातले हे बोल सांग कधी कळायचे?
सांग आठवण आली की काय करायचे?

नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?

फोन मात्र मीच करायचा,
How.....R... U मात्र तू बोलायचे,
तु दिसलीस की डोळे भरून पहायचे,
ऊघडले डोळे की ते मात्र स्वप्नच ठरायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?

तू अशी अर्ध्यात सोडून गेल्यावर मी कुणाकडे पहायचे?
तू पुंन्हा येशील की नाही असे असं तरी मी कुणाला विचारायचे?
सर्व असूनही आज तुझी कमी जीवनात भासते, असे तरी मी कुणाला सांगायचे.?
सांग आठवण आली की काय करायचे.....?

प्रेम एका मनाचं....


सखे, आज माझ मन खुप बेचैन झालय,
तुला डोळे भरून पाहण्यासाठी ते आतुर झालय,

असा एकही दिवस नाही की ज्यात
तुझी आठवन आली नाही,

एका क्षणात तू जवळ भासतेस तर
दुसरया क्षणी तू कुठे हरवतेस ??
पावसात भिजताना सुद्धा तूच का आठवतेस ??

का सखे??? का तू अस माझ्या मनाशी खेळतेस ??
आपलस करून दूर का करतेस???
खर सांग ना ग... तुझ मन माझ्यासाठी
तुला असच छळत का??

शुक्रवार, २३ जुलै, २०१०

येते तुझी आठवण जेव्हा मला.............


जाता जाता पटकन निघून गेलीस,
माघे फिरकुन सुधा पाहिले नाहीस,
येते परत असे म्हणायचे राहून गेले
माझे डोले तुलाच पाहत राहिले
पण परत तू कही आलीच नाहीस


आठवले ते आपले जूने दिवस की
मन माझे बेधुंद होउन बसते
ह्यातून बाहेर पडताना एवढी धडपड होते की
जग माझ्या कड़े पाहून हसत असते

आठवतात मला ते जूने प्रेमाचे क्षण,
तुला विसरता मात्र येत नाही ,
सगल काही करुण बघितले
साली ही सवय काही सुटत नाही


का येते तुजी आठवण सारखी सारखी मला
पार वेडा वेडा होतो मी आठवानित तुज्या
अजुनही उलघडले नाही हे कोड़े मला
सांग परत मला कधी घेशील जवळ तुज्या
अंधाराच आणी उजेडाच नात 
मला कधी कळलचं नाही 
तुही कधी उजेडात मला शोधलचं नाही .......?

अंधारही हवा हवासा होता
तुझ्या डोळ्यांच्या प्रकाशात
किती खोलवर उतरनार होतो जेव्हा तुलाच शोधयच होतं ...?

डोळ्यांच्या पापणीतील अंतर 
तेव्हां खुप खुप दुर वाटत होत
तुला जेव्हा डोळ्यात साठवल होत......?

अश्रुतुनी वाहनारी तुचं होती...
तुझेचं प्रतिबींब होते त्यात..
फक्त तुचं शोधु शकली नाहीस कधी अंधारात....?

श्वासांची लय चुकेल आता
नाव तुझं घेतांना.........
गडद अंधारात ओल्याचींब डोळ्यांनी तुला शोधतांना.....?

गुरुवार, २२ जुलै, २०१०

आज तू कुठे अन मी कुठे ,
शोधतो मी तुला जिथे तिथे .......
मनावर माझ्या तुझाच पहारा,
आता फ़क्त तुझ्या आठवणींचा सहारा .........
प्रत्येक चेहरया मधे शोधतो चेहरा तुझा ,
सांग ना या वेडया मनाला समजाऊ कसा ........
डोळ्यातून पडणारा प्रत्येक थेंब म्हणतो ,
सांग ना तुझ्याविना राहू कसा .........
सांग ना तुझ्याविना राहू कसा ..............

तुला आठवत असेल ,,,,,,,,,,,,


तू मला वचन दिल होतस
पावसाच्या पहिल्या सरिसोबत येण्याचे
थांबलेला प्रेमाचा प्रवास
पुन्हा सुरु करण्याचे ,,,,,,,

आज माझा हताश चेहरा पाहून मला सारेच विचारतात
अरे काय झाले तुझ्या प्रेमाचे
आता तूच सांग
मी त्यांना काय सांगू कारण आपल्या विरहाचे ,,,,,,,,,,,,,,,,,,

पाउस येवून जात आहे
पण चिन्ह दिसत नाही तुझ्या येण्याचे
आतातरी ये
नाहीतर दिवस निघून जातील पावसाचे ,,,,,,,,,,,

कदाचित तुझ्या मनात नसेल
मला दिलेले वचन पाल़ायचे
माझे जावू दे ग !
कसे करशील पावसाला दिलेल्या वचनाचे,,,,,,,

बुधवार, २१ जुलै, २०१०

मिठी म्हणजे असं शब्द, ज्यात तू आणि मी यात काही अंतरच उरत नाही,
वाटत की तुझ्याच मिठीत कायम स्वरूपी राहावं, कोणीही आपल्याला दूर न कराव....

मिठी म्हणजे मिठास आहे,
आपलेपणाचा सहवास आहे...

तुझ्या मिठीत असताना जगाचं भान राहत नाही, 
आपणच आहोत ह्या दुनियेत दोघंच, हाच भास होतो..

अंगावर येणाऱ्या शहाऱ्यांच पण भान मला राहत नाही......

***********************************************************************************

खूप विचार करतो तुझ्यासाठी न लिहिण्याचा पण मन काही मानतच नाही....

ह्या काही माझ्या सोन्या ( शितल ) साठी..........

जाऊन जाऊन जाशील तरी कुठे ?
अशी जागा आहे तरी कुठे ?
जिथे माझे प्रेम तुला आठवणार नाही,
आणि माझ्या आठवणी तुला सतावणार नाहीत.....

==================================================================

मला विसरण्याचा प्रयत्न लाख तू करशील..
पण ह्या वेड्या अमितच्या आठवणी तू काश्याकाय विसरशील ?

==================================================================

तू आता दूर गेलीस तरीही माझ मन तुझीच वाट पाहताय...
तू परत येशीलच असं माझंच मन माझी समजूत घालतंय...

==================================================================

तुझ्या आठवणीने दिवस निघून जात आहेत......
तुझ्या परत येण्याचे, हे डोलव आतुरतेने वाट पाहत आहेत...

तू पुन्हा कधी येशील हे मला माहित नाही, 
तुझ्याशिवाय हे मन माझं, माझ्याकडेच रहात नाही...

===================================================================

तू माझ्या मिठीत असायचीस तेव्हा मला कुणाचीच भीती नसायची.
पण तू आता पुन्हा माझ्या मिठीत येशील की नाही हीच भीती आता वाटतीये ........

===================================================================

तू माझी झाली नाहीस तर कुणाचीच होऊ नकोस,
नाहीतर तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा हा पक्षी पुन्हा कुणाशीच प्रेम करू शकत नाही..

===================================================================

मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला मी कसे सांगू,
तू आत्तातरी समजून घे ह्या अमितला असे तरी मी तुला कसे सांगू...?

===================================================================

आज तुला मी नकोय


आज तुला मी नकोय
हे मला कधीच कळल होत
तू सोडून जाणार आहेस
मी कधीच जानल होत
दुसरीकडे ओढ़ लागलेल तुझ मन
मला समजुन येत होत
खुप वाईट वाटत होत
पण काहीच सुचत न्हवत
दिवसातून हजारो मेसेज करणारी तू
पण आता सगळ बंद होत
खुप आठ वन येते म्हणत
आय लव यू च बोलन
आता संपून गेल होत
हे अचानक अस होइल अस कधीच वाटल न्हवत
प्रतेक मिनिटाला मोबाईल कड़े पहान
आज ही तसच चालु होत
ये मूर्खा फोन करना
तुझा आवाज ऐकायचाय
अस बोलणार कोणच उरल न्हवत
वरुण हसताना दिसलो तरी
मन रडन सोडत न्हवत
तुझ्या विरहात जगन
खुप कठिन झाल होत
देवा माझ्या स्वीट हर्ट ला उदंड
आयूष्य दे एवढच मागण
तुझ्या चरना जवळ होत
( कालजी घे मी कसाही जगेन पण तू सुखी रहा
तिला एवढच सांगायच होत ......आइ लव यू )