कळून चुकल तुझ्या मनातील सर्व काही,
कळून चुकल तुला माझी काळजीच नाही ,
ठरवलं खूप काही तर काहीही अवघड नाही,
पण तुला विसरण एवढ सोपही नाही,
कल्पना केल्या होत्या मनाने खूप काही,
पण प्रत्यक्षात काही घडलच नाही,
म्हणून स्वप्नही आता कसली उरलीच नाही,
तुझ्याबरोबरच आयुष्य सुरु कराव मनात अस कधी येत नाही,
कारण माहित आहे तू माझ्यासाठी बनलेलीच नाही,
का मी तुझी वाट नेहमीच पाहतो ?
का मी विनाकारण तुझ्याकडून अपेक्षा ठेवतो ?
शेवटी हेच कळत नाही?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा