तो अन ती दोघेही एकाच वाटेवर चालले होते… एकटेच..
त्याने तिला साद घातली अन म्हणाला , चालशील का या वाटेवर माझ्यासोबत ..
ती म्हणाली का रे ??
ठीक आहे चालते मी तुझ्यासोबत ..चालता चालता त्याने तिची विचारपूस केली,तिनेही कळत – नकळत त्यांची उत्तर ही दिली ,
दोघेही मन मोकलेपणाने गप्पा मारत ते अंतर कापू लागले ….
का कुणास ठावुक ?? दोघांच्याही मनात आतंरिक ओढ़ निर्माण होऊ लागली … याची तिला चाहुल होताच ती गप्प रहू लागली ..तीला गप्प राहण्याचे कारन विचारताच ती काही नाही अस म्हणाली ,
अन अचानक त्याने तिला विचारल ,"आज जशी या वाटेवर तू मला साथ दिली तशीच या जीवनातही देशील का ???"…
त्याच्या या प्रश्नावर तिनेही त्याला प्रश्न विचारला ,"या वाटेवर तू मला किती दिवस साथ देशील ??"
हा प्रश्न जणू काही तिच्या मनानेच विचारला होता …त्याच उत्तर काय असाव ??
त्याने उत्तर दिल ,"शेवटच्या श्वासपर्यंत "'…. अन तिने अपेक्षित न केलेले उत्तर तिला मिळल होत..
ती म्हणाली मी ही तुला या जीवनात साथ देइन….
आणि मग काय ,,,,
त्यानी या वाटेवर चालायला सुरुवात तर केली,
पण ….. पण …..
दोन पावल चालताच त्याचा हात सुटला.. अन तो काही न बोलताच गायब झाला ….
पण अजुन ही ती तिथेच उभी आहे, त्याच्या त्या एक शब्दावर अन त्या वाटेवर… त्याची वाट बघत…येइन तो कधीतरी…पण कधी ??? हेच माहित नाही...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा