फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१२

माझ्याच कविता आता जवळच्या वाटु लागल्यात

माझ्याच कविता आता जवळच्या वाटु लागल्यात


तुझी आठवण जे मला करुन देते
तु माझी असल्याचा भास करुन देते

वेडयासारखं का होईना
मी ही स्वप्नं पाहतो

सत्यात नसोत पण
स्वप्नात मी मिठीत तुझ्या खुप रडतो

मग रात्रही छोटी वाटते

तु निघुन जाते

आयुष्यातुन तर गेलीस
तु स्वप्नांतुनही जातेस

माझ्या प्रेम कहाणीचा करुन अंत
तु खुश असशील

मी ही खुश रहायचा आता प्रयत्न करतो

जाणीव होते मग मी एकटे पडल्याची
आता तु माझ्यासोबत कधीच नसल्याची

मग....??

पुन्हा एकटाच बसुन मी खुप खुप रडतो

तुला आठवत मी खोटं खोटं जगतो

तेव्हा माझ्याच कविता मलाही जवळच्या वाटतात...

बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील 
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

खरच

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?
पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले
फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…
माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार
फ़क्त एकच प्रश्न करतो,
खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का ???

आई ने विचारले

काल बोलता बोलता अचानक तुझा विषय निघाला
आई ने विचारले "आता काय करते रे ती ??"
नकळत पणे पापणी ओली झाली
इकडे तिकडे बघून पुसण्याचा अयशस्वी प्रयत्न हि झाला
"नाही माहित" म्हणून वेळ मारून नेली
सांगू तरी काय तिला ?
सोबतचे क्षण ? केलेल्या आणाभाका ? दिलेल्या शपथा?
कि तुझ्या लग्नातील शेवटची भेट ?

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०११

गरज आहे आज मला
तुझ्या त्या आधाराची
अडखळणारे पाऊल माझे
सावरणार्या त्या तुझ्या हातांची..

गरज आहे आज मला
त्या तुझ्या कोमल प्रितिची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणार्या त्या तुझ्या स्पर्शाची..
सारे जग असुरक्षीत वाटताच
तु जवळ आहेस या जाणीवेची
खरच गरज आहे रे आजहि मला....
तुझी....

माझ्या जीवनात अजुन
तुझी कमी वाटते.... :(

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०११

ही अखेरची तुझी आठवण

यापुढे माझ्या मनात

तुझे येणे जाणे असणार नाही..........

यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं

माझ्या मनात बरसणार नाही....

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस 

माझ्या मनाच्या अंगणात रिमझिमणार नाही......

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

शेवटचा निश्वास

संपला सारा खेळ् प्रेमाचा
उरले फ़क्त आठवणींचे अवशेष
दुर् गेल्या वाटा सुखाच्या
काहीच न राहीलेलं शेष

कधी केव्हा कुठे कसा
पण खुप जीवं लागला होता
त्यांच्या गंधाने माझ्या मनीचा
सारा आसमंत भारला होता

प्रेम निरपेक्ष असतं
म्हणणारी लोकं भेटली
करताना मात्र असं प्रेम
माझी अघोरी तडफ़ड झाली.

वाळवंटातल्या म्रुगजळागत
होता का सारा आभास
उडुन गेले स्वप्नील रंग आयुष्याचे
उरला हवेत शेवटचा निश्वास

बुधवार, १७ ऑगस्ट, २०११


माझ्या मनात प्रेमाची कळी फुलवलीस…

प्रेम काय असत हे माहीत नव्हत,
प्रेमात कस पडतात ते माहीत नव्हत,
प्रेम हा मुळात आपला विषयच नव्हता,
मग त्यात पास होण्याचा प्रश्नच येत नव्हता..

तिच्या अबोल हसण्याला मी काय नाव देऊ,
डोळ्यातल्या भावनांना कसे जाणून घेऊ,
तिच्यवर खरेच प्रेम केले,
हे तिला पटवून कसे देऊ…

चंद्राचे चांदणे एकवेळ त्याला सोडून निघून जाईल,
माझे शरीर एकवेळ श्वास घेणे सोडून देईल,
पण माझ्या मनाच काय करू…
ते तुझ्यावर निरंतर प्रेम करत राहील…..

मला सोडून जातेस,
खुशाल निघून जा,
पण जाण्या अगोदर…
माझ्या मनावर कोरलेले तुझे नाव पुसून जा….

जीवनाच्या अनोळखी वाटेवर,
तू मला भेटलिस,
लाडीक हसून,
माझ्या मनात प्रेमाची कळी फुलवलीस…

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

कालच माझी अंत्ययात्रा निघाली...

मला ती रोज दिसायची ..मला ती खुप आवडायची..
वाटायच विचारव पण तिच्या नकाराची भीती वाटायची..
उन पावसाची पर्वा ना करता मी रोज तिथे यायचो...
तिची एक झलक मिळवण्यासाठी किती किती झुरायचो..
एक दिवस हिम्मत करून विचारले..
तिने माझ्या प्रेमाला नाकारले..
माझ्या वेड्या जिवाला हा धक्का सहन नाही झाला...
अखेर तडफडतच माझा जिव निघून गेला..
कालच माझी अंत्ययात्रा निघाली...
ती कुठेच दिसत नव्हती...
म्हटल मी मेल्या वर तिचा आनंद ओसंडून जात असेल..
मला मेलेला बघायला ती देखिल आली असेल..
जाता जाता मला ती बघायला भेटेल...
तिचा सुंदर चेहरा मला डोळ्यात साठवायला भेटेल..
माझी वेडी नजर तेव्हा पण तिलाच शोधत होती...
सगलीकडे बघितल कुठेच दिसत नव्हती..
तीला तिची चुक उमगली होती..
म्हणे दिवसभर ती देवळात बसली होती.........