फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शनिवार, ६ जुलै, २०१३

फक्त तुझ्यासाठी...


आयुष्य असेच सरले, धावत आठवणींच्या पाठी
सबंध आयुष्य वाट पहिली, मी फक्त तुझ्यासाठी.....


तुझ्या येण्याची वाट पाहत, शब्द गोठले आज ओठी
ह्रुदयात दुःखाचे भास कवळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

जगलो असा की मी, जगणे राहून गेले पाठी
डोळ्यातले अश्रु ह्रुदयात कोंडले, मी फक्त तुझ्यासाठी.....

हर घडी तुझ्या प्रेमाची, मनात ठेवली आस मोठी
त्या आशेवर जगत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझ्याच समोर झुकते मन, हे मन ही आहे फार हट्टी
याच हट्टावर आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्यासाठी.....

नाशिबाशी झगडत झगडत, न तोड़ता प्रेमाच्या गाठी
त्या गाठीना सामभालुन, ठेवले मी फक्त तुझ्यासाठी.....

एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा, आज माझ्या डोळ्यात दाटी
त्या क्षणानना उराशी कवटाळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

अंधार विजत उजेड यावा, भान विसरून जूळावि मीठी
याच स्वप्नांना आयुष्य समजलो, मी फक्त तुझ्यासाठी.....

तुझीच वाट पाहत, जळले ह्रदय प्रेमाकाटी
भिन्न दिशांना झुरत, राहिलो मी फक्त तुझ्यासाठी.......!!

तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार ....


खुश राहणार असशील तर माझी हरकत कधीच नसणार
तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार

स्वप्न तुटतात मग त्रास होतो
मी आता नाही बघणार...

विरह हा नाही सहन होत ग
मी आता नाही जगणार

संपवेन स्वताला
आणि तुझ्या वाटेतला काटा दूर होणार

रडू नकोस माझ्या मरन्यावर
मला सहन नाही होणार

कारण तुझे ते अश्रु पुसायला मी नसणार
कारण तुझ्या हाताला आता मेहंदी लागणार....

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१२

माझ्याच कविता आता जवळच्या वाटु लागल्यात

माझ्याच कविता आता जवळच्या वाटु लागल्यात


तुझी आठवण जे मला करुन देते
तु माझी असल्याचा भास करुन देते

वेडयासारखं का होईना
मी ही स्वप्नं पाहतो

सत्यात नसोत पण
स्वप्नात मी मिठीत तुझ्या खुप रडतो

मग रात्रही छोटी वाटते

तु निघुन जाते

आयुष्यातुन तर गेलीस
तु स्वप्नांतुनही जातेस

माझ्या प्रेम कहाणीचा करुन अंत
तु खुश असशील

मी ही खुश रहायचा आता प्रयत्न करतो

जाणीव होते मग मी एकटे पडल्याची
आता तु माझ्यासोबत कधीच नसल्याची

मग....??

पुन्हा एकटाच बसुन मी खुप खुप रडतो

तुला आठवत मी खोटं खोटं जगतो

तेव्हा माझ्याच कविता मलाही जवळच्या वाटतात...

बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील 
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

खरच

खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का?
प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का?
पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले
हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले
परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले
कधी न रडणार मी, पण मला तू रडविले
फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का…
माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार
पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार
माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार
आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार
फ़क्त एकच प्रश्न करतो,
खरच मला तुझ्यावर प्रेम करायला हवे होते का?
प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का ???

आई ने विचारले

काल बोलता बोलता अचानक तुझा विषय निघाला
आई ने विचारले "आता काय करते रे ती ??"
नकळत पणे पापणी ओली झाली
इकडे तिकडे बघून पुसण्याचा अयशस्वी प्रयत्न हि झाला
"नाही माहित" म्हणून वेळ मारून नेली
सांगू तरी काय तिला ?
सोबतचे क्षण ? केलेल्या आणाभाका ? दिलेल्या शपथा?
कि तुझ्या लग्नातील शेवटची भेट ?

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०११

गरज आहे आज मला
तुझ्या त्या आधाराची
अडखळणारे पाऊल माझे
सावरणार्या त्या तुझ्या हातांची..

गरज आहे आज मला
त्या तुझ्या कोमल प्रितिची
भय दाटताच या मनी
आपलेपणा देणार्या त्या तुझ्या स्पर्शाची..
सारे जग असुरक्षीत वाटताच
तु जवळ आहेस या जाणीवेची
खरच गरज आहे रे आजहि मला....
तुझी....

माझ्या जीवनात अजुन
तुझी कमी वाटते.... :(

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०११

ही अखेरची तुझी आठवण

यापुढे माझ्या मनात

तुझे येणे जाणे असणार नाही..........

यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं

माझ्या मनात बरसणार नाही....

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस 

माझ्या मनाच्या अंगणात रिमझिमणार नाही......

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०११

शेवटचा निश्वास

संपला सारा खेळ् प्रेमाचा
उरले फ़क्त आठवणींचे अवशेष
दुर् गेल्या वाटा सुखाच्या
काहीच न राहीलेलं शेष

कधी केव्हा कुठे कसा
पण खुप जीवं लागला होता
त्यांच्या गंधाने माझ्या मनीचा
सारा आसमंत भारला होता

प्रेम निरपेक्ष असतं
म्हणणारी लोकं भेटली
करताना मात्र असं प्रेम
माझी अघोरी तडफ़ड झाली.

वाळवंटातल्या म्रुगजळागत
होता का सारा आभास
उडुन गेले स्वप्नील रंग आयुष्याचे
उरला हवेत शेवटचा निश्वास