फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, ११ एप्रिल, २०११

ती हसरं टपोरं गुलाब ,
जितकं नजरेत साठवावं ,
तितक अपूर थोड फार ...!!

ती पावसाची चाहूल देत ,
बेधुंद वाऱ्यावर नाचणारी मोर ,
लाजरी तरी बेभान वेडी पोर ...!!

ती पौर्णिमेचा पुर्णगोल चंद्र ,
असले हजारो डाग त्यावरी तरी ,
अस्सल सौंदर्य त्यातच दडलेलं ...!!

गुरुवार, २४ मार्च, २०११

तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता,
तिच्या राधारूपी मनाचा वेगळाच कृष्ण होता.
तिच्या कक्षाच अमर्याद होत्या अन वेगवान गती,
माझे क्षितिजच होते तोकडे, अगदी हाताच्या अंतरावरती,
अन जीवनात चालण्याचा मार्गही भिन्न होता.
पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

तिच्याकडे बुद्धी होती, चातुर्य होतं,
रुपाची अन धनाची तर श्रीमंती होती,
माझ्याकडे बुद्धी सोडून इतर सगळ्याची नापसंती होती,
मग का वळवावे मत तिने तिचे,
हा परखडतेचा बाण तिचा तीष्ण होता.
पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

यावे तिने कधीतरी अन बोलावे जरा गोड,
हसताना दाबावी लाजेने डाळिंब फोड,
द्यावा हातात हात, सांगावी जन्माची साथ,
पण ती बुद्धीनेही जरा हुशार होती व्यवहारात,
तिने कसे मावावे माझ्या तुटपुंज्या प्रवाहात(पगारात),
समजत होते सारे तरी प्रीतीचा भाव मनी सूक्ष्म होता.
पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

मी कवटाळायचो जेव्हा तिच्या आठवांना,
ती वेगळ्याच बाहुपाशात असायची,
खरंतर मी संपायचो साऱ्यातून जिथून,
तिथून तिची सुरुवात व्हायची.
ती कोमलस्पर्शी, नाजूक नयनी,
सुवर्णकांती अप्सरा माझी नव्हती,
हा वास्तव मला मान्य होता.
पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

बुधवार, १६ मार्च, २०११


हवेच्या झुळ्केसारखी जीवनात माझ्या आलीस 
मला न कळतंच मला सोडूनही गेलीस 

रडत असताना तूच माझे अश्रू पुसलेस,
हास्य जेव्हा आले ओठावर तूच मला रडवलेस,

तुटलेला असताना तूच मला सावरलेस....
तुज्यावर विश्वास ठेवला आणि तूच मन माझे तोडलेस...

तू चांगली बनून माझ्या मदतीला आलीस....
मला न कळताच मला मोडूनही गेलीस,

भावनाशुन्य असताना मनाला स्पर्श केलास,
माझे मन बदलले तू मात्र भावनाशुन्य बनलीस...

सुकलेल्या मनावर तू प्रेमाचा पाऊस पाडलास 
मन माझे बहरले तू मात्र वृक्ष तोडीला लागलीस,

तू आपलं म्हणून माझ्या आयुष्यात शिरलीस 
मला न कळताच मला परकाही करून गेलीस 

सोमवार, १४ मार्च, २०११

फक्त तुझ्यासाठी......


आयुष्य असेच सरले, धावत आठवणींच्या पाठी
सबंध आयुष्य वाट पहिली, मी फक्त तुझ्यासाठी.....
तुझ्या येण्याची वाट पाहत, शब्द गोठले आज ओठी
ह्रुदयात दुःखाचे भास कवळले, मी फक्त तुझ्यासाठी.....

जगलो असा की मी, जगणे राहून गेले पाठी
डोळ्यातले अश्रु ह्रुदयात कोंडले, मी फक्त तुझ्यासाठी.....

हर घडी तुझ्या प्रेमाची, मनात ठेवली आस मोठी
त्या आशेवर जगत राहिलो, मी फक्त तुझ्यासाठी.....
तुझ्याच समोर झुकते मन, हे मन ही आहे फार हट्टी
याच हट्टावर आयुष्य बेतले, मी फक्त तुझ्यासाठी.....
नाशिबाशी झगडत झगडत, न तोड़ता प्रेमाच्या गाठी
त्या गाठीना सामभालुन, ठेवले मी फक्त तुझ्यासाठी.....
एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा, आज माझ्या डोळ्यात दाटी
त्या क्षणानना उराशी कवटाळले, मी फक्त तुझ्यासाठी.....
अंधार विजत उजेड यावा, भान विसरून जूळावि मीठी
याच स्वप्नांना आयुष्य समजलो, मी फक्त तुझ्यासाठी.....
तुझीच वाट पाहत, जळले ह्रदय प्रेमाकाटी
भिन्न दिशांना झुरत, राहिलो मी फक्त तुझ्यासाठी.......!!

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०११

"तीच प्रेम लहरी,
न सांगताच रुसनार.

माझ प्रेम मात्र निरागस,
तिच्या गालावरचा एक एक अश्रु पुसणार.


तीच प्रेम हट्टी,
वाट्टेल तस वागणार.

माझ प्रेम मात्र सोशिक,
तिची चुक असुनही मान ख़ाली घालून माफ़ी मागणार.


तीच प्रेम भित्र,
कायम दुरून मजा पाहणार.

माझ प्रेम मात्र निर्भिड,
आख्या जगाच्या विरोधात तिच्या पाठी उभ रहाणार.


तीच प्रेम हुशार,
पावसामधे स्वतः साठी आडोसा बघून वाकणार,

माझ प्रेम मात्र वेड,
तिला उन लागु नये म्हणून दोन्ही हातानी सारा आसमंत झाकणार.


तीच प्रेम स्वार्थी,
माझ्यापासून दूर जाण्यासाठी भांडणार,

आणि माझ प्रेम हिरमुसलेल,
तिने मोड्लेला डाव पुन्हा पुन्हा मांडणार....!"

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०११


आजही आठवतोय मला
त्या आभाळाचा प्रकोप
कोसळणा-या पावसात
तो तुझा अखेरचा निरोप ...
काळजावर दगड ठेउन
मी जा म्हणालो आणी तु गेलीस
एकदाही मागे न वळता
आयुष्यातुन कायमची हरवलीस.
तुला रोखू कसे मला सुचलेच नाही
पावसात गळणारे माझे डोळे
तुला दिसलेच नाही ...
मी स्तब्ध होतो पण
काळीज मात्र कींचाळत राहीलं
डोळ्यांसोबत ते आभाळही
रात्रभर गळत राहीलं ...
तु गेल्यावर हे आयुष्य वाळवंट
आणी मी ... मी निवडूंग झालो.
तो गाव कधीच सोडला
आणी वेशीवर बेधुंद झालो
आजही त्याच दिशेला
वेड्या सारखा शोधत असतो काही
डोळे भरून येतात खरे
पण आभाळ... आभाळ मात्र भरत नाही.

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

पुन्हा मी मिळणार नाही

मागून बघ जीव ही
नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही...

तुझा झालो तेव्हाच मी
माझ्यासाठी संपलो होतो,
प्रत्येक क्षण तुझ्यासाठी,
तुझ्या बरोबरच जगलो आहे..
श्वसांच्या प्रत्येक स्पंदणात
फक्त तुलाच तर जपले आहे,
मागून घे श्वासही, नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही... 

तुझे माझे काय असते
कधी मला कळलेच नाही
तुझ्या शिवाय जगायचे
स्वप्न ही कधी मला पडले नाही,
मागून घे स्वप्नेही, नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही... 

स्वर्ग सजवायचा तुज्यासाठी
म्हणून सार करत होतो
जमिनीवर उभे राहून
आकाशालही पकडत होतो
उघडून बघ मूठही, नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही.... 

ईतकेच सांगतो तुला ही
माझ्या शिवाय जमणार नाही
आणि तुझे ते तरफडणे
मी सहन करणार नाही
मागून घे अंतही, नाही मी म्हणणार नाही
नको करुस माझ्या प्रेमाची मस्करी
पुन्हा मी मिळणार नाही...
पुन्हा मी मिळणार नाही...

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०११

खरं प्रेम म्हणजे.......

खरं प्रेम म्हणजे दोघांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देणे.

खरं प्रेम म्हणजे दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे.

खरं प्रेम म्हणजे दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे.

खरं प्रेम म्हणजे दु:खात एकमेकांच्या सोबत असणे.

खरं प्रेम म्हणजे सुखात एकमेकांना आनंद देणे.

खरं प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं.

खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे.

खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे.

खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे.

खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.

खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं.

खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे.

खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे.

खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.

खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे.

खरं प्रेम म्हणजे … तू अणि मी, कायम जवळ असणे..!!