फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

गुरुवार, १६ डिसेंबर, २०१०

शेवटची भेट मजसी न कळाली.

शेवटची भेट ती
आज नियतीने लिहिली होती
कर्दनकाळी रात्र ती
आज आली होती ...

लिखित होता विरह आमुचा
तरीही तो बदलायचा होता
बेरंग होता प्रेमाचा साचा
रंग त्यात भरायचा होता...

शेवटची भेट आमुची
आजही तिथेच होती
थोड्या दिवसाची प्रेमकहाणी
जिथे लिहिण्यात आली होती...

प्रेमाचा गंध तो आज
हवेतुनी नाहीसा झाला होता
जन्माची साथ देणाऱ्या चंद्रानेही
तार्यांचा आज साथ सोडला होता...

प्रेमाचे ते दिवस सारे
आज कोठेतरी हरवले होते
उभे होतो सामोरी आम्ही दोघे
तरीही अंतरावर वाटत होते...

नाही जमणार म्हणुनी
सहज पाठ तिने फिरवली
उभा होता वेडा मी तिच्या प्रतीक्षेत
शेवटची भेट मजसी न कळाली...मजसी न कळाली..
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली
तर जिवनात दुःख उरलं नसतं
दुःखचं जर उरलं नसतं
तर सुख कोणाला कळलं असतं....?

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं


मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....आणि अशाच वेळी,

आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं 
खरं प्रेम एकदाच होतं

ते कधीही विसरता येत नाही

शुद्ध, हळव्या भावनांचं आभाळ
अनेकांवर पसरता येत नाही....!!!!!!

मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

तुझ्यासाठी काही - माझ्या मनातलं

बस हि शेवटची कविता - "तुझ्यासाठी काही - माझ्या मनातलं"
पोहचल्या माझ्या भावना तर reply कर.......

असं काहीस लिहील होतं मी त्या mail मध्ये
पण तरही reply आलाच नाही

एक मन म्हणाले बस आता
लिहायचेच नाही, शब्दांशीही बोलायचे नाही.....
तुझ्यासाठी लिहिणाऱ्या........
माझ्या त्या शब्दांवरही चिडलो थोडा वेळ.....

पण दुसरे मन म्हणाले, 

"तू नाही पण, तू दिलेल्या आठवणीना शब्दात तर जपता येईल"
तूच तर दिल्यात आता भावना लिहायला,
हा......, कधी पापण्यातही भरून येतात त्या !,
कधी वाहतात अगदी आटेपर्यंत......डोळ्यातून !
अजून काय बोलू वेदना सांगायला आता शब्दच उरले नाही

आलीस online पण, बोलली काहीच नाहीस
दिसल्या माझ्याच कवितेच्या शेवटच्या चार ओळी satus वर
पण तेही मनाला सावरून गेलं,
शब्द तर ठेवलेस माझे मनात जपून, याच समाधान वाटल

पण............

कस ग जमत कोणाला, ज्यावर प्रेम आहे त्याच्याशी अबोला धरायला?
काश.......
मलाही जमल असतं तर....
गरज नसती पडली शब्दांचा अबोला सहन करायला.....!!!!!! 
आज पुन्हा खूप दिवसांनंतर तुझी आठवण आली 

किंतु पूर्वीच्या आठवणींपेक्षा हि जरा होती वेगळी

आधीच्या आठवणीत होतीस तू माझ्या जवळची  

आताच्या आठवणीत राहिलीस तू फक्त एक क्षण दुखाची  

आधीच्या आठवणीत होतीस तू एखाद्या पावसातल्या पहिल्या सरीसारखी  

आताच्या आठवणीत बनली आहेस केवळ अश्रुतल्या थेम्बासारखी 

पूर्वीच्या आठवणीत होतीस तू एक सुखद हळुवार हवेच्या झुलकीसारखी 

किंतु आताच्या आठवणीत राहिलीस तू जखमेवर फुंकर घालणारया वेदनेच्या जाणीवेसारखी 

तू होतीस माझ बालपण 

जे काळाच्या ओघात वाहत जाऊन आता राहिली आहे केवळ एक आठवण.......

शुक्रवार, १० डिसेंबर, २०१०

कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे.........

नाती

जीवन वाटेवर अनेक जुळतात नाती
काही कोमेजती,काही फ़ुलतात नाती...
दु:ख देती तसेच सुखावतात नाती
कुणास आयुष्यभर छळतात नाती...

वात्सल्य,प्रेम,मायेत झुलतात नाती
विश्वासाने हळूहळू खुलतात नाती...
कुठे हरवती कुठे मिळतात नाती
क्षणिक स्वार्थापोटी भुलतात नाती...

हातात हात घेऊनी चालतात नाती
सुखात जवळ दु:खात पळतात नाती...
काही पणती सारखी जळतात नाती
कायमची ह्रुदयाला काही सलतात नाती...

मनात जरी रुजतात नाती

प्रेम, मायेने हसतात नाती...
अविश्वास होता थोडासा
एकमेकांवर का रुसतात नाती...?

काही वळणावर हरवतात नाती
स्वार्थापोटी मिरवतात नाती...
आपुलकी कुठे असते हल्ली
माणसे कुठे टिकवतात नाती...?

घास प्रेमाचा भरवतात नाती
धडा नात्यांचा गिरवतात नाती
गैरसमज मनात जागता थोडासा
कायमची का दुरावतात नाती..?

मंगळवार, ७ डिसेंबर, २०१०

घेतलीय भरारी मी.....!

घेतलीय भरारी मी आता 
क्षितीज नवे गवसण्यासाठी
सगळे स्वप्ने चिमण्या डोळ्यामध्ये साठवून
सगळ्या आकांक्षामध्ये नव्याने रंग भरून 

पंखाना जखम झाली म्हणून काय
पक्षी उडण सोडून देतात?
नव्याने पंखात भरून जोम पुन्हा उडू पाहतात.....
असेल अस तर....

ठेच लागली म्हणून 
मी का चालण सोडव?
दुखावलं कोणी मन म्हणून 
भावनांशी नात का तोडाव? 

मलाही वाटतंय आता नव्याने 
शब्दांशी नात जोडावं 
परत एकदा भावनेचे बोट 
धरून काही जिव्हाळ्याच लिहावं
शब्दाने तर जग जिंकता येत ना.... 
मग शब्दांपासून का नाही काही शिकावं?

कारण म्हणतात,
"कुणाचंच कुणावाचून अडत नाही,
मग पाखर का पंखावाचून उडत नाही?" 
तसंच,
शब्दावाचून माणूस घडला,
असंही कधी घडत नाही....!

आठवण म्हणजे...


आठवण म्हणजे नक्की
काय भानगड असते?
प्रत्येकाच्या मानामध्ये
का घर करुन बसते?

आठवण असते...
कधी तिखट कधी गोड
कधी लहान कधी थोर,
कधी व्यक्त कधी अव्यक्त
कधी दु:खी कधी आनंदी.

आठवण असते...
आईचा हात धरुन
दुडू दुडू पळणारी,
बाबांच्या खांद्यावरुन
सारं गावं फ़िरणारी.

आठवण असते...
वर्गामधल्या मित्राची
हळूच खोडी काढणारी,
शाळेला दांडी मारुन
चिंचा बोर खाणारी.

आठवण असते...
बावरलेल्या नजरेनं
कॉलेजकडे पाहणारी,
कट्य़ावरच्या गप्पांमधे
तासनतास रमणारी.

आठवण असते...
तिच्या लाज-या स्मीतासाठी
दिवस रात्र झुरणारी,
मनातल्या भावना तिला
सांगायला घाबरणारी...

आठवण म्हणजे...
गतकाळाच्या क्षणांची ती
गोड साठवण असते,
प्रत्येकाच्या आयुष्याला
सुवर्ण कोंदण असते.

माझा काय दोष होता

माझा काय दोष होता
प्रत्येकजण मलाच सोडून गेला
मी नेहमी जपल्या सगळ्यांच्या भावना 
प्रत्येकजण माझंच मन मोडून गेला
नव्हत्या काहीच अपेक्षा, 
नाही काही मागणे
फक्त चूक इतकीच आहे
निस्वार्थी पणे देत राहणे
का काही माणस अशी 
जिवलग होऊन जातात
क्षणभरही विचार न करत 
झटकून अर्ध्यात सोडून जातात
भरपूर काही दिल तरी
सगळंच राहून जात रीत 
खरच का............?
अर्धात्वाच्या शापाने शापित असत नात......!

प्रेम मी हि केलं

प्रेम मी हि केलं

सगळे म्हणतात प्रेम कराव, त्यात हरून जावं,
कोणीतरी आपल्याला आपलं म्हणावं,

पण मला आता अस का वाटत
तिच्या पासून दूर निघून जावं....?

मी ही प्रेम केलं मनापासून,
पण ती कधी समजलीच नाही
मग मी तिच्यासाठी स्वतःला का विसरावं...?

तिने मजेत जागाव
आणि मी का वाट पाहत राहावं...?

पण आता मी ठरवलंय,
असं जागाव की, सगळ्यांनी पाहत रहाव ,
आणि हे पाहून तिनेही कधीतरी आपल म्हणाव .

कधी कधी असं का वाटत ,
बस झालं आता मरून जाव...!!