
आजही आठवतोय मला
त्या आभाळाचा प्रकोप
कोसळणा-या पावसात
तो तुझा अखेरचा निरोप ...
काळजावर दगड ठेउन
मी जा म्हणालो आणी तु गेलीस
एकदाही मागे न वळता
आयुष्यातुन कायमची हरवलीस.
तुला रोखू कसे मला सुचलेच नाही
पावसात गळणारे माझे डोळे
तुला दिसलेच नाही ...
मी स्तब्ध होतो पण
काळीज मात्र कींचाळत राहीलं
डोळ्यांसोबत ते आभाळही
रात्रभर गळत राहीलं ...
तु गेल्यावर हे आयुष्य वाळवंट
आणी मी ... मी निवडूंग झालो.
तो गाव कधीच सोडला
आणी वेशीवर बेधुंद झालो
आजही त्याच दिशेला
वेड्या सारखा शोधत असतो काही
डोळे भरून येतात खरे
पण आभाळ... आभाळ मात्र भरत नाही.