फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, २८ जुलै, २०१०

मी रात्री झोपण्यापूर्वी..

मी रात्री झोपण्यापूर्वी..
सर्व दारे, खिडक्या लाऊन घेतो..
पण एक छोटासा झरोका मात्र उघडा ठेवतो..
तुझ्या आठवणींना येण्यासाठी...

त्या येतातही, अन मनात साठून राहतातही
मनाच्या खोलीत ठेवलेल्या या सा-या,
तुझ्या आठवणी मी नेहमी तपासून पाहतो..
कारण त्यांनासुद्धा आहे,
अशीच वेळी अवेळी बाहेर पडायची सवय..

त्या व्यवस्थित हृदयामध्ये निजल्याची खातरजमा
केल्याशिवाय मी माझ्या खोलीच्या बाहेर पडत नाही..

समुद्राच्या लाटांनी मन मोहरून गेले

समुद्राच्या लाटांनी मन मोहरून गेले 
तुझ्या आठवांनी पुन्हा ते बहरून गेले 
वारा मंद वाहत आहे, 
जणू स्पर्श तुझा होत आहे
लाटांच्या आवाजाचा आव घेऊन 
जणू पैंजण तुझे गात आहे
त्याच ठिकाणी बसलो आहे 
जिथे तू आणि मी भेटायचो 
तुझ्या डोलत बुडणाऱ्या माझ्या 
मनाला किती मुश्कीलिनी आवरायचो
खंत एकच आहे आज 
एकटाच सूर्यास्त पाहत आहे 
आणि अलगद एक लाट 
पायाला स्पर्श करून गेली
बघ पुन्हा..................
गतकाळाच्या पडद्या आडून तुझी आठवण आली आहे........... 

तुझ्या आठवणीत मनपाखरू,

तुझ्या आठवणीत मनपाखरू, 
जेव्हा फिरते भिरभिर
ओल साचते डोळ्यात, 
नी काळजात दुखते खोलवर

विव्हळणा-या वेदना, 
सुखावून जातात आठवणीने,
आणि विसावल्या जखमाही, 
जाग्या होतात क्षणभर

येणा-या आठवणींसाठी मी, 
जागा करतो घरात माझ्या
जगून घेतो संगे, 
जसा कधी जगलोच नव्हतो आजवर

तुला जायचे असेल तर, नक्की जा...

तुला जायचे असेल तर, नक्की जा...
एकदा फुटक्या हृदयाचे गाणे तरी ऐकून जा...

आणि तू काही आठवणी देणं लागतेस...
तेवढ्या मात्र माघारी देऊन जा..

खेळ संपला की, 
डाव परत मांडण्याच्या आशाही संपतात..

तू तर माझ्या आयुष्याशी खेळलीस,
किमान मला त्या आठवणींसोबत खेळू देत...

तुझ्या कडून तर कधी, भेटलेच नाही मला काही 
हवे तर माझा अंकुरलेला जीव पुन्हा एकवार घेऊन जा 

पण तू काही आठवणी देणं लागतेस...
तेवढ्या मात्र माघारी देऊन जा..

मी रोज वेळेवर उठतो,

मी रोज वेळेवर उठतो,
ठरलेली लोकल पकडतो,
वेळेआधी ऑफीस गाठतो,
थोपलेली कामे करतो,
निमुटपणे मिळेल ते खातो,
ओवरटाईम करून घरी येतो..
नंतर रात्रभर जागा राहतो....

तुला विसरण्यासाठी कुठलीच रात्र पुरत नाही...

आणि सकाळी उठल्यावर,
जगण्याच्या गर्दीत हरवलेला आठवणींचा धूसर चेहरा..
मला आरश्यातून डोकावून पाहतो...

कुठे वाहतो आता मी

कुठे वाहतो आता मी, 
पहिल्यासारखा गर्दितून ?
हां जरासा डोकावतो, 
फक्त कधीतरी अधून मधून,

आता नसतो मी जात, 
दोन दोन तास फिरायला,
मी गेलो की तुला, 
कारण मिळायचं ओरडायला,

मित्र म्हणाला म्हणून, 
घेत नाही टपरीवरचा कटींग
वेळेवर येतोही घरी, 
करत नाही लेट नाईट मिटींग
..
..

तुला जे जे आवडायचं नाही,
ते ते सगळंच थांबवून टाकलंय
तुझ्या आठवणी जगतोय, म्हणून
सध्या आयुष्यही लांबणीवर टाकलंय
..

फक्त थोडा उशीर झालाय.... 
इतकंच.... 

एकदा सांग ....


माझ्या आठवणीतील रंगीत वाटा
तुझ्याही स्मरणात असतील का ?
माझ्या पायात रुतल्यावर काटा
तुलाही कळ पोचत असेल का ?

आणि असे काही नसेल
किंवा नजरेआड झाल्यानंतर
स्मरणाआडही झालो असेल मी......
तर, मी हे शरीर सोडताना पाण्यात

एकदा शेवटचे सांग ....
..
..

तुझे गाव या प्रवाहाआड असेल का ?