फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, १३ जून, २०११

ये ना परतुन प्रिये.....

तुला पाहुनच मी जगतो
स्वप्नात तुला मी बघतो
तुझ्यासाठीच जीव तरमळतो
ये ना परतुन प्रिये.....


जीव झाला एकटा
साथ नाही कुणाचा
आवाज तुला मी देतो
ये ना परतुन प्रिये....


आठव ते क्षण्
हातात हात घालुन फ़िरलेले
साद तुला मी देतो
ये ना परतुन प्रिये.....


माझ्याविना जरी तु
सुखी असली तरी
कसा मी जगतोय पाहण्यास
ये ना परतुन प्रिये.....


या वेड्या जीवाला
आस तुझीच आता
श्वास थांबण्याअगोदर
ये ना परतुन प्रिये....


सुरवात आपल्या प्रेमाची
आठवत तुला नसेल तर
शेवट माझा पाहण्यास
ये ना परतुन प्रिये.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा