फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

सोमवार, १३ जून, २०११

प्रेमच ते असे लपविता येत नाही हेच खरे.....अश्रू ते लोचनी लपवतेस कशाला ?
सांग पापण्यांना फसवतेस कशाला ?

शब्द येता ओठी त्यास अडवतेस कशाला?
मग चावून अधराना दुखावतेस कशाला?

येता विचार मनी, दडवतेस कशाला?
देवूनी हुंदके मग रडतेस कशाला?

गर्दी भावनांची, तू झाकतेस कशाला
भाव विभोर चेहर्याला , असली शिक्षा कशाला

कशा कशाला तू फसवशील, रडवशील, झाकशील
आठवण येता त्याची राहवेल का त्या खळ्यांना

खुदकन हसून फोडतील सारे भांडे तुझे ...
प्रेमच ते असे लपविता येत नाही हेच खरे.....

एक थेंब तुझ्यासाठी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा