फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, २१ जून, २०११

हम्म... जरा नव्याने... खरच
नव्याने सुरुवात करावी म्हणतोय मी ....
दोन चार ओळी लिहून
काही तरी सांगावे म्हणतोय मी ...

ते पावसाचे रीमझीमणे
अन त्यातल्या कातरवेळीच्या आठवणी
पुन्हा एकदा ओठावर येतात
तीच ती विरहाचे गाणी......

रेशमी केसांच्या बटा
ती गालावरची खळी..
छ्या ... नको वाटतात
आता त्या आठवणी...

छळणाऱ्या या आठवणी
घर करून बसतात मनी...
कातरवेळ आली कि....
येतात फिरून माघारी...

शब्दातीत यांचे वर्णन...
करावे म्हणतोय मी...
दोन चार ओळी लिहून
काही तरी सांगावे म्हणतोय मी ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा