फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

बुधवार, १ डिसेंबर, २०१०

आठवणीच्या सावाल्यांमागे
धावण्यात काही अर्थ नाही

तरीही मन हे माझे मुळीच ऐकत नाही
कधी गुडघ्यात डोक घालून
शांत पडून राहत..............
कधी माळरानावर सैरा-वैरा धाऊ लागतं
तर कधी तुझ्या आठवणीच्या मागे
सुसाट पळत सुटत
मी मनाला थांबवत म्हणतो,
"नाही दिसणार आहे आता ती तुला कधी"
मग मन म्हणत,
"म्हणून तू विसरणार आहेस तिला कधी?
अरे वेड्या.............!
आपण बहरलो म्हणून,
शर्त नसते प्रेमात दुसऱ्यानेही बहरण्याची...!

तिचं नसल तरी आपण नात जपावं
हीच तर खरी रीत आहे प्रेम करण्याची.................." 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा