फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

मी संपतो आहे


आज जीवनाच्या एका वळणावर मी उभा आहे
मागे वळता पाहतो तर मी एकटाच आहे

जरा मन बिथरले,कावरे बावरे झाले
माझ्या नजरांना केवळ तीचेच वेध लागले

पण ती शेवटी मला दिसली,ती तीच होती
पण एक गोष्ट मात्र कळली की तिची वाट मात्र आता वेगळी होती

माझ्या डोळ्यांत अश्रू तरारले,
पण तिचे अश्रू ही माझ्या मनात घर करून गेले

मी माझ्या आसवांना आसरा देऊ शकलो
पण तिच्या अश्रूंना नाही पुसू शकलो

मनात आले धावत जावे,तिला मिठीत घ्यावे
आणि तिच्या प्रत्येक अश्रूला हृदयात साठ्वावे

पण मला कळले की मी हाताश् आहे
आणि तिचे जग आता किती वेगळे आहे

तिचे जग वेगळे आहे
कारण ती तुमच्या सारखी सामान्य आहे
आणि मी हे म्हणतोय
कारण मजला आज मृत्यूने वेढले आहे

मी आता तुमच्यात नसणार आहे
पण माझे अस्तित्व तुमच्यात कायमचे राहणार आहे

कारण मी तिच्या हृदयात असणार आहे
तिच्या प्रत्येक आसवांत हसणार आहे

आणि शेवटी ह्या वाटे वर मी एकटाच आहे
तरीही त्यामध्ये एक आगळा आनंद आहे
कारण "मी संपतो आहे"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा