फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शनिवार, ३१ जुलै, २०१०

सदैव... माझ्यासोबत असतात.. तुझ्या आठवणी...

एकांतात जवळ येऊन,हळूच रडायला सांगतात
रडताना तुला आठवायला,पुन्हा पुन्हा भाग पडतात

त्या असतात तुझ्या आठवणी ....डोळ्यांची कवाडे बंद ठेवली तरीही
मनातून डोळ्यात प्रवेशतात
आणि पुन्हा गालावर घरंगळून
आपली उपस्थिती दाखवतात

त्या असतात तुझ्या आठवणी...रात्रीच्या जीवघेण्या गडद एकांतात
मला अंधुकश्या आनंदाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात
आणि वास्तवाशी फारकत घेतलेल्या
मस्तवाल आठवणींसोबत जरा वेळ घालवल्यावर
पुन्हा एकदा मनातल्या कोपऱ्यात जाऊन बसतात

त्या असतात तुझ्या आठवणी...
तुला विसरण्याच्या प्रयत्नात असताना..
क्षणाचीही उसंत न देता,
तुझ्याकडे शिळ घालून बोलवणाऱ्या
आणि पुन्हा एकटाच चालायला लावणाऱ्या

त्या असतात तुझ्या आठवणी...

सदैव... माझ्यासोबत असतात.. तुझ्या आठवणी....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा