फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, २ जुलै, २०१०

तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस


तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे

फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस

एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही

मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही

मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस

मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस

बरंच काही निघून गेलयं तरीही मी उभाच आहे,
अर्थ सर्वच संपून गेलाय तरीही जीवन सुरुच आहे

वेळ केव्हा निघून गेली मला कधी कळलेच नाही
कळले जेव्हा मला तेव्हा हाती काहीच उरले नाही

आता सर्व शांत झालयं वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता श्रावणानंतर होत तसं

तरीही,

तरीही बरंच काही शिल्लक आहे अजून माझ्या हाती,
काही शण अजूनही आहेत फक्त माझ्यासाठी...

त्यावरच तर जगतो आहे
हसतो आणि रडतो आहे

एकच गोष्ट फक्त मी माझ्याकडची हरलो
प्रत्येक शणी आजही मी फक्त तुझ्यासाठी झुरलो

आजही मला एकच फक्त सांगावेसे वाटते
आयुष्याच्या या शणीही 

तुझी उणीव भासतेय
तुझी उणीव भासतेय......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा