फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

मंगळवार, २५ मे, २०१०


प्रेम करावे पण जरा जपून.........

प्रेम करावे पण जरा जपून,,,, 
असे सल्ले देणारे खूप भेटतात...
 
प्रेमात हि अगदी आधी तेच पडतात....
 
प्रेमात पडल्यावर स्वतःही पेक्षा जास्त,,,,
 
प्रेमाला जपावं लागतं,,,,
 
खरं तर स्वतःचा विचार करायला,,,
 
भानच कोणाला असतं...
 
प्रेमात पडल्यावर आयुष्य,,,
 
इंद्र धनु सारखं रंगत...
 
आकाश हि कधी कधी,,,
 
गुलाबी भासायला लागतं..
 
प्रेमात पडल्यावर आयुष्य,,,
 
जसं बहरूनच जातं...
 
काट्यातून चालतानाही,,,
 
फुलांनी स्पर्शल्या गत वाटतं...
 
अन् अचानक हे,,,
 
प्रेमच हरवलं तर,,,
 
सगळंच हरवून जातं...
 
श्वास चालू असतात हि,,,
 
पण जगणंच थांबून राहतं..
 
म्हणूनच म्हणतात,,,
 
प्रेम करावे तर जपूनच..
 
विश्वास ठेवावा तो डोळे उघडूनच....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा