फक्त तुझ्याचसाठी …

माझा फोटो
Mumbai, Maharashtra, India
वेड मला लावुन तु शहाणी झालीस... प्रेम माझ्यावर करुन तु का दुसर्याची झालीस? नव्हतचं करायचे प्रेम शेवट पर्यतं तर का सुरुवात केलीस?

शुक्रवार, ३० एप्रिल, २०१०

तू म्हणालीस, "मी मागशील ते देशील?"...
"तू फ़क्त मागून तर बघ.....", मी अस म्हटल खर..

पण...
तू माझी स्वप्नं मागशील, अस कधीच वाटल नव्हत...

तरीही

कसलाच विचार न करता,

लगेच सगळी स्वप्ने तुझ्या ओंजळीत दिली...

ती घेतलीस आणि दूर निघून गेलीस
मागे वळून न बघता...

किती सहज होत तुझ्यासाठी हे सगळ....

अंगठा कापून दिल्यावर त्या एकलव्याची 

काय अवस्था झाली असेल, 
हे आता कुठे कळायला लागलय मला...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा